BIG BREAKING | मराठा आरक्षणाचं काम कुठपर्यंत आलं? सरकारने जरांगेंना बैठक घेऊन सांगितलं सविस्तर

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी सरकारने जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी काय-काय काम केलं, याची सविस्तर माहिती दिली.

BIG BREAKING | मराठा आरक्षणाचं काम कुठपर्यंत आलं? सरकारने जरांगेंना बैठक घेऊन सांगितलं सविस्तर
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 6:21 PM

मुंबई | 2 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आज घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे देखील सहभागी आहेत. या बैठकीनंतर लगेच काही वेळाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारकडून मनोज जरांगे यांना सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीविषयी माहिती देण्यात आली. या बैठकीत काय-काय चर्चा झाली या विषयी माहिती देण्यात आली.

मराठा आपक्षण उपसमितीच्या पार पडलेल्या बैठकीत तीन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठवाड्यात कुणबी दाखले असलेले उर्दू मोडी दाखले तपासले जाणार आहेत. याबाबत बैठकीत चर्चा झाली. दुसरा विषय म्हणजे मागासवर्ग आयोगाला राज्यभरातून मनुष्यबळ उपलब्ध करून देत मदत करण्याबाबत निर्णय झाला. तसेच या बैठकीत क्यूरेटिव्ह पिटीशन संदर्भात चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली.

सरकारनेल जरांगेंना काय-काय सांगितलं?

  • हैदराबादसोबत कुणबी नोंदीसाठी पत्रव्यावहार झाल्याची माहिती सरकारने मनोज जरांगे यांना दिली.
  • शिंदे समिती हैदराबाद आणि तेलंगणात जाऊन पुन्हा काम करणार आहे
  • कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचं काम 85 टक्के पूर्ण झालं आहे.
  • आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचं युद्धपातळीवर काम सुरु आहे.
  • मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
  • सुप्रीम कोर्टात भक्कम बाजू मांडणार, अंसही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘नोंदी सापडल्या, सरकारकडे मोठा पुरावा’, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक पार पडण्याआधी मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “मराठवाड्यात सर्व कुणबी आहेत. त्याचे सर्व पुरावे सरकारला दिले आहेत. ओबीसींच्या 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलं आहे. तत्सम म्हणून मराठ्यांची जात आहे. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर तिथल्या हैदराबादच्या मराठ्यांना आताही आरक्षण आहे याचे पुरावे आम्ही तिथून जाऊन आणले आहेत. आम्ही इथपर्यंत पुरावे दिले आहेत. आतातर नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा पुरावा आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“मला त्यांचं आधी ऐकायचं आहे. त्यांची नेमकी बैठक कशासाठी आहे, त्यांचं नेमकं काय चाललंय, ते पाहिल्यावर भूमिका मांडेल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. सरकारच्या गॅझेटमध्ये सगळे कुणबी आहेत, असंच दाखवलं आहे. तशी आकडेवारीच दिली आहे. कोणत्या तालुक्यात किती मराठा, कुणबी होते याची आकडेवारी दिली आहे. याचे पुरावे आम्ही सरकारला दिले आहेत. मराठवाड्यात मराठा नाहीच तर कुणबी आहेत. मराठवाड्याचे मराठे गेले कुठे?” असं मनोज जरांगे म्हणाले.

'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?.
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; बघा काय झालं?
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; बघा काय झालं?.
चंद्रचूड-शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा
चंद्रचूड-शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा.
मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?
मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?.
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?.
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?.
जरांगे - लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ... वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप
जरांगे - लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ... वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप.
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.