राऊत यांचं सरकार कोसळण्याचं ते विधान म्हणजे…; मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे, मुनगंटीवार, गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?

आमदार संजय गायकवाड यांनीही राऊतांवर टीका केली. महविकास अभद्र आघाडीच्या मोर्चात तीन लाखांच्या टार्गेट ऐवजी तीस हजारही लोक जमले नाहीत.

राऊत यांचं सरकार कोसळण्याचं ते विधान म्हणजे...; मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे, मुनगंटीवार, गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?
मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे, मुनगंटीवार, गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 8:23 AM

मुंबई: महाविकास आघाडीचा काल विराट महामोर्चा पार पडला. या महामोर्चाची आझाद मैदानात सांगता झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा केला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनीही संजय राऊत यांच्या भविष्यवाणीवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या भाकितावर प्रतिक्रिया देत त्यांची भविष्यवाणी खोडून काढली आहे.

आमचं सरकार भक्कम सरकार आहे. ते डबल इंजिन सरकार आहे. कोणी म्हणाले एक महिन्यात हे सरकार पडेल. आता पाच महिने झाले हे सरकार मजबूत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लफंगे कोण आहेत? लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे. खुर्ची मिळवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार सोडून कोणी काय केले हे सर्वानी पाहिले आहे. त्यामुळे मला जास्त बोलावसं वाटत नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राऊत यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांचे राहिलेले खासदार, आमदार हे केव्हा जातील याची त्यांना भीती आहे म्हणून अशा प्रकारची टीका केली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारने 164 आमदारांचं बहुमत दोन वेळा सिद्ध केलं आहे. जर संजय राऊत यांना संशय असेल आणि बहुमत परत सिद्ध करायचं असेल तर नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा प्रस्ताव आणावा, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

जर त्यांनी पुन्हा प्रस्ताव आणला तर आता आमचे आमदार 164 आहेत. ही संख्या वाढून 184 वर जाईल, असा दावा करतानाच त्यामुळे सत्ता गेल्यापासून घाबरलेल्या अवस्थेत वेगवेगळी कारण सांगितली जात आहेत, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

विरोधी पक्षाचा मूळ गाभा आहे, त्या गाभ्यापासून विरोधी पक्ष दूर गेला आहे. जनता शेवटी निवडणुकीत निर्णय करत असते. शब्दाचा बाजार मांडून ज्या पद्धतीने हे खेळ करत आहेत त्यावरून येणाऱ्या निवडणुकीत जनता मतदानाच्या माध्यमातून यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा दावा आहे, असंही ते म्हणाले.

2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रचंड मोठा विजय आम्हाला प्राप्त होईल. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत आम्ही सर्व जागा जिंकू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे मंगेरीलाल आणि गणपतवाणी यांचे वंशज आहेत. जनतेने 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीला निवडून दिले होते. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झिडकारले होते. महाराष्ट्रात आणि देशात त्यांची सत्ता होती मात्र कुठलाही विकास त्यांनी केला नाही.

जनतेने त्यांना परमनंट सुट्टी दिलेली आहे. त्या आधारावर जर संजय राऊत फेब्रुवारी महिन्यात आमची सत्ता येईल असं म्हणत असेल तर हे गणपतवाणी आणि मुंगेरीलाल यांचे वंशजच आहे, असं म्हणावं लागेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनीही राऊतांवर टीका केली. महविकास अभद्र आघाडीच्या मोर्चात तीन लाखांच्या टार्गेट ऐवजी तीस हजारही लोक जमले नाहीत. त्यामुळे जनमत त्यांच्यासोबत किती आहे यावरून दिसतेय.

लोकांना रात्री स्वप्नं पडतात. मात्र, संजय राऊतां दिवसा स्वप्नं पडतात. दिवसाचे स्वप्न कधी साकार होत नसतात. आमचं सरकार पूर्ण काळ टिकेल. पोकळ भविष्यवाणी कधी खरी होत नसते, अशी टीकाही त्यांनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.