निवडणूक आचारसंहितेपूर्वी पोलीस पाटलांसाठी मोठा निर्णय, मानधनात भरभरुन वाढ, अंगणवाडी सेविकांचा पगार वाढला
cabinet meeting decision police patil | पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला होता. अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
गिरीश गायकवाड, मुंबई | 13 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात भरभरुन वाढ केली आहे. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांचे मानदन वाढवण्याची मागणी होत होती. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला होता. अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. तसेच आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.
पोलीस पाटलांवर काय असते जबाबदारी
ज्या गावात पोलीस ठाणे नसते, त्या गावात पोलीस पाटलांची नियुक्ती केली जात आहे. गावातील तंटे, हाणामाऱ्या आणि वादविवाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्वाची भूमिका बजावत असतात. पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन मिळत होते. परंतु त्यांना 24 तास कर्त्यव्य बजावावे लागत होते. कुठे काही घडल्यास पोलीस पाटलास पोहचावे लागत होते. यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनकडून मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. अनेक वर्षे पोलीस पाटलांचे मानधन 3 हजार होते. त्यामध्ये 2019 मध्ये वाढ करण्यात आली. हे मानधन 6 हजार 500 इतके करण्यात आले होते.
मंत्रिमंडळातील इतर महत्वाचे निर्णय
- महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारण्यात येणार आहे. महानंद नफ्यात आणणार
- शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थान.
- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
- पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता
- आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ
- जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते
- मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार