Inside Story | ‘वर्षा’वर हायव्होल्टेज बैठक, मुख्यमंत्र्यांकडून आमदार-खासदारांसमोर जाहीर नाराजी व्यक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदार-खासदारांच्या बैठकीत जाहीरपणे अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्याकडून आमदार-खासदारांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले.

Inside Story | 'वर्षा'वर हायव्होल्टेज बैठक, मुख्यमंत्र्यांकडून आमदार-खासदारांसमोर जाहीर नाराजी व्यक्त
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 10:10 PM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदार उपस्थित राहीले होते. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

अजित पवार गटाने आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सत्तेत अशताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्यास जनतेत चुकीचा मेसेज जाईल. आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचा मेसेज जाऊ शकतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं?

दरम्यान, या बैठकीत अतिमहत्त्वाच्या विषयांवर महत्त्वाच्या सूचना आमदार-खासदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना या बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून आमदार-खासदारांना देण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुका या येत्या एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले.

जोमाने काम करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा जिंकून आणायचं आहे, अशी सूचना या बैठकीत देण्यात आली. तसेच मतदारसंघात जोमाने मोर्चेबांधणी करायला सुरुवात करा, असा आदेश शिंदे-फडणवीसांनी दिला.

आमदार-खासदारांना आणखी काय-काय सूचना देण्यात आल्या?

  • या बैठकीत मराठा आरक्षणावरही आमदार-खासदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीयांची भूमिका एकच असायला हवं, असं सांगण्यात आलं.
  • तिन्ही पक्षात एकजूट ठेवा, समन्वय राखा, एखमेकांवर टीका टिपण्णी करणं टाळा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या.
  • सत्तेत राहून सरकारविरोधात कुठलीही भूमिका घेऊ नका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
  • आरक्षणाबरोबरच येणाऱ्या निवडणुकीसाठी देखील कामाला लागण्याचे आदेश देण्यात शिंदे-फडणवीसांकडून देण्यात आले.
  • मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश आमदार-खासदारांना देण्यात आले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.