पडलेले चेहरे, आशाळभूत नजरा, आणि प्रचंड चलबिचल, मुख्यमंत्र्यांनी ताफा रोखला आणि….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतर्कतेमुळे आज एका रुग्णाला वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या रुग्णाचे नातेवाईक या मदतीसाठी खूप समाधान व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी रुग्णाची विचारपूस करत असताना थेट डॉक्टरांना फोन करत योग्य उपचाराचे आदेश दिले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशील स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं हे राजकारणाचा एक भाग होता. पण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय हे सर्वसामान्यांसाठी थेट फायदा देणारे ठरले आहेत. यामध्ये महिलांसाठीचा एसटी बसच्या तिकीटाचा निर्णय आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवासाचा निर्णय यांचा समावेश आहे. याशिवाय असे अनेक काही निर्णय आहेत. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपला ताफा अडवत मुंबईत एका रुग्णाला मदतीसाठी धावून गेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टरांना फोन करुन उपचाराच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात जी रुग्णसेवा केली त्याची तुलना होऊ शकणार नाही. त्यांनी कोरोना काळात अफाट काम केलं. त्यांनी मदतीसाठी एक व्यवस्थाच उभी केली. त्यातून त्यांनी वैद्यकीय कक्षच उभा केला. याशिवाय ते वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णसेवा करतच असतात. त्यांनी नुकतंच एका नंदुरबारच्या आठ वर्षाच्या अपंग चिमुकल्याला पाच लाखाची मदत केली. तसेच त्याला दोन्ही कृत्रिम हात बसवण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली.
मुख्यमंत्री नेहमी गरजूंना मदत करत असतात. त्यांच्या मदतीमुळे अनेकांना फायदा देखील झालाय. मुख्यमंत्र्यांच्या स्वभावातील संवेदनशीलपणाचं आजदेखील दर्शन घडलं आहे. त्यांनी एका रुग्णाचा जीव वाचवला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला, रुग्णाच्या नातेवाईकांकडे विचारपूस
एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असताना त्यांना रस्त्यात एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसली. या रुग्णवाहिकेबाहेर जे रुग्णांचे नातेवाईक होते त्यांचे निराशाजनक चेहरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आले. एकनाथ शिंदे यांच्याकडून हे बघितलं गेलं नाही. काहीतरी समस्या झालीय, अशी एकनाथ शिंदे यांना खात्री पटली. त्यामुळे ते मदतीसाठी पुढे धावले. त्यांनी आपला ताफा थांबवला आणि ते रुग्णवाहिकेच्या दिशेला चालत आले. यावेळी त्यांच्यासोबत असणारी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा रुग्णवाहिकास्थळी आली.
मुख्यमंत्र्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांची विचारपूस केली. रुग्णाची विचारपूस केली. तसेच त्यांनी दुसऱ्या रुग्णवाहिकेचा बंदोबस्त केला आणि रुग्णाला रुग्णालयात पाठवलं. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी डॉक्टरांना फोन लावून योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या ताफ्यातील रुग्णवाहिका दिली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी रुग्णाला रुग्णालयात पाठवण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका दिली. त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना काय अडचण आहे ते विचारलं. तसेच लगेच डॉक्टरांना फोन केला. यावेळी त्यांनी रुग्णाचं नाव सांगत तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्याची सूचना डॉक्टरांना दिली. यावेळी डॉक्टरांनी योग्य उपचार करण्याची हमी दिली.
मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवरही या घटेनबाबत माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी – कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर सांगितलं.
गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी – कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली.
यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा… pic.twitter.com/rd7deJgpR6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2023
“यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले. अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली”, असा प्रसंग एकनाथ शिंदे यांनी सांगितला.