महाराष्ट्रात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाची पाटी बदलली, नवीन नाव आले…

Eknath Shinde | मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाची पाटी बदलण्यात आली आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.

महाराष्ट्रात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाची पाटी बदलली, नवीन नाव आले...
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 2:31 PM

गिरीश गायकवाड, मुंबई | 13 मार्च 2024 : मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाची पाटी बदलण्यात आली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनाची पाटी बदलली आहे. नवीन पाटी लावताच मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी पाहण्यासाठी येत होते. तसेच मंत्रालयात येणाऱ्या लोकांसाठी हा उत्सुकतेचा विषय ठरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाटी आता “एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे” अशी झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाची अंमलबजावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी आता बदलण्यात आलेली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

आदिती तटकरे यांचा प्रस्ताव

राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असे ठरवली.

एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे करण्यात आले आहे. माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.