मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या भोऱ्याची मदत करणार
प्रजासत्ताक दिनी शाळेत केलेल्या भाषणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या चिमुकल्याची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आली आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनी शाळेत केलेल्या भाषणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या चिमुकल्याची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून घेण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून आज इयत्ता पहिलीत शिक्षण घेणाऱ्या कार्तिक वजीर अर्फ भोऱ्या याची आज विचारपूस करण्यात आलीय. कार्तिकला दृष्टीबाधा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बातम्या दोन दिवसांपासून येत होत्या. अखेर या सर्व घटनांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कार्तिकची दखल घेण्यात आलीय. विशेष म्हणजे कार्तिकवर मुंबईतील रुग्णालयात मोफत उपचार करुण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कार्तिकशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्तिकची विचारपूस केली.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत केलेल्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर ऊर्फ भो-या या चिमुकल्याला वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत केली जाणार #eknathshinde #CMO @CMOMaharashtra pic.twitter.com/qM8L9csnsm
हे सुद्धा वाचा— CHETAN PATIL (@chetanpatil1313) January 30, 2023
कार्तिक वजीरने आपल्या अनोख्या शैलीत लोकशाहीची व्याखा सांगितलीय. त्याच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. त्याच्या भाषणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्तिकची विचारपूस करण्यात आलीय.
“26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी शाळेत केलेल्या सुंदर भाषणाने महाराष्ट्र राज्याचा बालहिरो ठरलेला, आपल्या सर्वांचा लाडका भोऱ्याशी आज व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा संपर्क प्रमुख दादासाहेब थेटे यांनी हा संवाद घडवून आणला”, अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी दिली.
“भोऱ्याला दूरदृष्टीचा प्रॉब्लेम आहे, भोऱ्याला लवकरच पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्याकडे मुंबईत दाखविण्यात येणार आहे. भोऱ्याला जी जी आवश्यक मदत लागेल ती सर्व मदत आणि सर्वोत्तम उपचार संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे”, अशी माहिती मंगेश चिवटे यांच्याकडून देण्यात आली आहे.