तानाजी सावंत यांच्या उलट्या होतात वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?

"आपली अजित पवार यांच्यासोबत गेले दोन-तीन दिवस चर्चा झाली नाही. ते दोन-तीन दिवस दौऱ्यावर होते. ते काल कॅबिनेटमध्ये नव्हते. मी कुठे काय बोललो आहे? प्रमुख माणूस कुठे काय बोलतोय? मी तर माझी भूमिका तुमच्यासमोर मांडली ना?", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

तानाजी सावंत यांच्या उलट्या होतात वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?
तानाजी सावंत आणि एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 7:22 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बाजूला बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा सुरु होती. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना समज दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

“आमच्या मंत्री महोदयांनाही मी सांगितलं, आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीत बेबनाव होईल, असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. ठिक आहे, कधीकधी काही गोष्टी, प्रत्येकाला काही ना काही वेगवेगळा अनुभव येत असतो. त्यातून काही वक्तव्ये येत असतात. पण आपल्याला मी सांगतो, आमची महायुती आहे. महायुतीत भांड्याला भांडं लागतं. कुटुंबातही कधीकधी मतभेद होतात. पण आमचं स्वत: किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी महायुतीत अशाप्रकारचे बेबनाव होतील, असं होणार नाही. महायुती अबाधित आहे. महायुती चांगलं काम करत आहे. काही छोट्या-मोठ्या कुरबुरी आहेत. त्या मिटून जातील”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

अजित पवारांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे, त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आपली अजित पवार यांच्यासोबत गेले दोन-तीन दिवस चर्चा झाली नाही. ते दोन-तीन दिवस दौऱ्यावर होते. ते काल कॅबिनेटमध्ये नव्हते. मी कुठे काय बोललो आहे? प्रमुख माणूस कुठे काय बोलतोय? मी तर माझी भूमिका तुमच्यासमोर मांडली ना?”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणं किंवा कुणाचं नाव घेणं टाळलं. “आपण काम करत राहायचं. फळाची अपेक्षा करायची नाही. मी काम करतोय. कुठलं फळ मिळेल, या अपक्षेने मी काम केलं नाही. मला काय मिळेल, यापेक्षा मी राज्याला काय देईन, हे मी पाहिलं. माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आणि राज्य सरकारला काय फायदा होईल हे मी पाहिलेलं आहे. आम्ही टीम म्हणून मिळून काम करतोय. टीम म्हणून काम करत राहणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.