सर्वात मोठी बातमी, शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सर्वात मोठी बातमी, शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 7:39 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव, शिर्डीत सदाशिव लोखंडे, दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता.

काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. पण त्यावरुन भाजपमध्ये नाराजी परसल्याचं वृत्त समोर आलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आज शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रात ठाण्याच्या कार्यालयाचा पत्ता

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करत लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रसिद्धीपत्रकात ठाण्याच्या आनंदआश्रमचा पत्ता आहे. याचाच अर्थ शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाण्याच्या आनंदआश्रम कार्यालयाला आता जास्त महत्त्व असणार आहे.  ठाकरे गटाच्या दादरमधील शिवसेना भवनाला महत्त्व आहे. तसं आता शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाण्यातील आनंदआश्रम कार्यालयात आता महत्त्व असल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचं मुंबईतील नरिमन पॉईंट येथे देखील बाळासाहेब भवन म्हणून प्रमुख कार्यालय आहे. पण उमेदवारांची घोषणा झाली त्या प्रसिद्धीपत्रकात ठाण्याच्या आनंदआश्रमाचा पत्ता आहे.

shiv sena candidate list

शिवसेना उमेदवारांची घोषणा

कोण कुणाच्या विरोधात लढणार?

  • शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी समोर आल्यामुळे आता 8 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत कोण कुणाच्या विरोधात लढणार ते स्पष्ट झालं आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आता ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्या लढत निश्चित झाली आहे.
  • शिंदे गटाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे दोन उमेदवार इथे समारोसमोर निवडणुकीच्या रणांगणात बघायला मिळणार आहेत.
  • बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव अशी लढत बघायला मिळणार आहे.
  • मावळमध्ये ठाकरे गटाकडून संजोग वाघेर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिंदे गटाकडून आता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वाघेर विरुद्ध बारणे अशी लढत आता मावळमध्ये असणार आहे.
  • हिंगोलीत ठाकरे गटाकडून नागेश पाटील-आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शिंदे गटाकडून आता खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.