काळं-पांढरं करण्याची दुकानं ते कामात खोडा घालण्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय?

"आपण पाहिलं की विकासकामांना खोडा घालण्याचं काम काही लोकं करत आहेत. त्यांना त्यांचं काम करु द्या", असं एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर म्हणाले.

काळं-पांढरं करण्याची दुकानं ते कामात खोडा घालण्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांचं नेमकं म्हणणं काय?
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 6:54 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोरच ठाकरे गटावर नाव न घेता निशाणा साधला. “काही लोकांची इच्छा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होऊ नये. पण आमची, महाराष्ट्राची जनेतेची आणि मुंबईकरांची अपेक्षा होती की, विकास कामांच्या भूमीपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हावं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच रस्ते काँक्रीटीकरणामुळे काही लोकांचं काळं-पांढर करण्याची दुकानं बंद होतील, तेच त्यांचं दुखणं आहे, असा निशाणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी साधला.

“आपण पाहिलं की विकासकामांना खोडा घालण्याचं काम काही लोकं करत आहेत. त्यांना त्यांचं काम करु द्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“दरवर्षी मुंबईकरांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये गेलेले पैसे वाचवण्याचं काम करतोय. पण हे काही लोकांना नकोय. कारण पुढचे 25 ते 40 वर्षे रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. लोकांचा खड्ड्यातला प्रवाक मुक्त होईल. म्हणून डांबरीकरणाच्या निमित्ताने काळं-पांढरं करणाऱ्या लोकांची दुकानं बंद होतील, हे दु:ख आहे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

” मी एवढंच सांगेन आमचं सरकार पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने काम करतंय”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचाही ठाकरे गटावर निशाणा

यावेळी सर्वात आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आपली उद्विग्नता बोलून दाखवली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही 2019 मध्ये सांगितलं होतं की पाच वर्षाच्या डबल इंजिन सरकार आणा. आपल्यावर विश्वास ठेवून देशातील नागरिकांनी डबल इंजिनचं सरकार आणलं. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनाचं सरकार नाही बनू शकलं. पण बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार इथे तयार झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.