BREAKING | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार, मोठी घोषणा करणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री आठ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

BREAKING | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार, मोठी घोषणा करणार?
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 5:54 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज रात्री 8 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय माहिती देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणार या विषयी उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. रात्री आठ वाजेची वेळ ही महत्त्वाची मानली जाते. अनेकजण यावेळेला टीव्ही पाहतात. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेबाबत आधीच माहिती जारी करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री आठ वाजेची मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद ही महत्त्वाची असणार हे मात्र नक्की आहे.

मुख्यमंत्री नेमकं कोणत्या मुद्द्यांवर बोलणार?

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे अनेक घडामोडी या पडद्यामागेही घडत आहेत. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याचीदेखील चर्चा आहे. खासदार गजनान कीर्तीकर यांनी तर जाहीरपणे याबाबतची नाराजी व्यक्त केलेली. त्यानंतर आज भाजपने शिवसेनेचे खासदार ज्या मतदारसंघात निवडून आले तिथे संयोजक नेमल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे काही भाष्य करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांवर बोलणार?

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेनुसार राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला 6 हजार रुपये देणार आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा मिळण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय इतर महत्त्वाचे देखील निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबद्दलही मुख्यमंत्री आजच्या पत्रकार परिषदेत माहिती देण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेणार?

गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार-खासदारांवर टीका केली आहे. शिंदे सरकार पूर्ण कार्यकाळ संपेपर्यंत टिकणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. या दरम्यान, अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. या सर्वांच्या टीकेला आज रात्री आठ वाजेच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.