भाजपच्या गोंधळातून त्यांचा ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल केलाय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल केलाय. सोमरवारी (5 जुलै) भाजपने अधिवेशनात जो गोंधळ गेला त्यामुळे राज्याची मान शरमेनं खाली आली. या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच जी माहिती पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मागितली ती अधिकृत ठराव करुन मागितली. यात चुक काय? असाही सवाल त्यांनी केला (CM Uddhav Thackeray allege that BJP hate OBC).
उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधी पक्षाने सोमवारी (5 जुलै) केलेलं वर्तन राज्याची मान शरमेने खाली नेणारं होतं. याला कारण काय होतं तर ओबीसी समाजासाठी जे राजकीय आरक्षण आणलं गेलं त्याबद्दलची माहिती केंद्र सरकारकडे मागितली. ही माहिती मागणं हा गुन्हा आहे का? मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान मोदींना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना भेटून या माहितीची मागणी केली. राज्यपालांनाही पत्र देऊन मागणी केलीय. भाजपला ती माहिती निरुपयोगी वाटत होती तरी त्यांनी सरकारला वाटतंय तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकजुट दाखवत पाठिंबा द्यायला हवा होता. पण या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलचा द्वेष उफाळून वर आला.”
“अधिकृत मागणी करुनही राज्य सरकारला जी माहिती मिळत नाही ती विरोधी पक्षनेत्यांना कधी आणि कुणी दिली?”
“आम्ही जी माहिती पंतप्रधान मोदींना भेटून मागितली होती, तीच माहिती अधिवेशनात अधिकृतपणे ठरावाच्या माध्यमातून केली. यात चूक काय? छगन भुजबळांनी ती माहिती कुणीकुणी कशीकशी मागितली त्याचा घटनाक्रम सांगितला. ती माहिती अद्यापही मिळालेली नाही. यावर विरोध पक्षनेत्यांनी या माहितीत 8 कोटी चुका आणि राज्यात 70-75 लाख चुका असल्याचं म्हटलं. मग हा इतका चुकीचा डेटा केंद्र सरकार का जोपासत आहे. त्यांनी सांगून टाकावं की यात चुका झाल्या आहेत. ते केंद्र सरकारने सांगितलं पाहिजे. पण सरकार म्हणून आम्ही अधिकृत मागणी करुनही राज्य सरकारला जी माहिती मिळत नाही ती विरोधी पक्षनेत्यांना कधी आणि कुणी दिली? याचा खुलासा व्हायला पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
हेही वाचा :
8 कोटी चुका आहे, मग ही माहिती पंतप्रधानांच्या योजनेसाठी कशी वापरता? : उद्धव ठाकरे
परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ : उद्धव ठाकरे
पदोन्नतीसह मुस्लिम आरक्षणासाठी आठवलेंचा एल्गार, उद्या आझाद मैदानात रिपाइंचं आंदोलन
व्हिडीओ पाहा :
CM Uddhav Thackeray allege that BJP hate OBC