दोन्ही डोळ्यांनी अंध, 2 महिन्यात एकही रजा नाही, सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल करुन मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी

शारीरिक अपंगत्वावर मात करणाऱ्या दोन कॉल ऑपरेटरची दखल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली (CM Uddhav Thackeray call blind phone operator).

दोन्ही डोळ्यांनी अंध, 2 महिन्यात एकही रजा नाही, सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल करुन मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 4:34 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधातील लढाईत अनेक लोक आपआपलं योगदान देत आहेत. असंच एक विशेष उदाहरण मुंबईत पाहायला मिळालं. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही मुंबईतील या कोरोना योद्ध्याने सलग 2 महिने एकही सुट्टी न घेता काम केलं. आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत केलेल्या त्यांच्या या कामाची दखल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली (CM Uddhav Thackeray call blind phone operator). त्यांनी या अंध कॉल ऑपरेटरला कॉल करुन अभिनंदन केलं. तसेच त्यांच्या कामाची प्रशंसा करत कौतुकाची थाप टाकली. राजू चव्हाण आणि संदीप शिंदे असं या कर्मचाऱ्यांचं नाव आहे. ते सेंट जॉर्ज रुग्णालयात काम करतात.

दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून राजू चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढले होते. पण हा कॉल थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आला होता. मुख्यमंत्र्यांनी राजू चव्हाण यांना कॉल करुन अभिनंदन केलं.

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून रोज काम कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदे देखील नियमितपणे मीरा रोड येथून सेंट जॉर्जला पोहचतात आणि कर्तव्य बजावतात. चव्हाण हे दिवसपाळी, तर शिंदे हे रात्रपाळीवर असतात. यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योध्याशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरविले. त्याप्रमाणे ते चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्यांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले. तसेच मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चव्हाण यांना म्हणाले, “तुम्ही खूप चांगले काम करता आहात. अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्ही दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतात”.

ऑपरेटरचे काम करताना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करत नाही. अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात. गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. अशावेळी त्यांना आम्ही धीर देतो त्यांना मार्गदर्शन करतो, अशी भावना राजू चव्हाण यांनी व्यक्त केली.

ज्ञात अज्ञात कोविड योद्धे

उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षा देखील व्यक्त केलेली नाही. कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात-अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू.”

“विशेषत: मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विविध आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रती आदर वाटतो,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

एक दिवस बोललं नाही, तर प्रॉब्लेम होईल असं संजय राऊतांना वाटतं : दरेकर

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस

CM Uddhav Thackeray call blind phone operator

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.