‘आशा’ सेविका लढवय्या, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात तुमची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री
मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. (CM Uddhav Thackeray Conversation with ASHA Workers)
मुंबई : ‘आशा’ सेविका लढवय्या आणि वीरांगणा आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. (CM Uddhav Thackeray Conversation with ASHA Workers about COVID in Children)
मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारचा शुभारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
‘आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेस काम आशा ताई करीत आहेत. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. महाराष्ट्र करीत असलेल्या कामाचं देशात, परदेशात कौतुक होत आहे. त्यासाठी तुमच्या कामाचे योगदान महत्वपूर्ण आहे.
एखाद्या बहरलेल्या झाडाला घट्ट उभ करण्याचं काम त्याची जमिनीत खोलवर गेलेली मुळं करतात. त्याप्रमाणे आशाताईंचे काम असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
“आपल्या व्यथांवर मार्ग काढण्यासाठी थोडा अवधी द्या”
आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसरणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे. त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले.
महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात. तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार आहे. ती रोखण्यासाठी आशा ताईंची भुमिका महत्वाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुलांमधील कोविड संसर्ग: आशा सेविकांची जबाबदारी | COVID in Children Responsibility of ASHA Workers https://t.co/QTq61M5Qka
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2021
(CM Uddhav Thackeray Conversation with ASHA Workers about COVID in Children)
संबंधित बातम्या :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार; कोरोना संकटावर बोलण्याची शक्यता
कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील नाहीत, जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे
‘… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान