Udhav Thackrey on ED : ईडी आहे की घरगडी, देवेंद्रजी तुम्हाला केंद्रानं घेतलं पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांवर सीएम सुसाट
शुक्रवारी मलिकांच्या राजीनाम्यावरून आणि भ्रष्टाचारावरून फडणवीसांनी (Devendra Fadnavis) हल्लाबोल केला. तर आज फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) पलटवार केलाय.
मुंबई : राज्यात सध्या ईडीच्या कारवाईचा (ED Raid) धडका सुरू आहे. यावरून भाजप महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतंय. तर महाविकास आघाडी या कारवाईवर पक्षपाताची टीका करतेय. शुक्रवारी मलिकांच्या राजीनाम्यावरून आणि भ्रष्टाचारावरून फडणवीसांनी (Devendra Fadnavis) हल्लाबोल केला. तर आज फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) पलटवार केलाय. मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. पण कोणत्या थराला जायचं. मलिकांचा राजीनामा तथ्य असेल तर करू ना. पण आरोपात तथ्य तर पाहिजे. एखादा नेता चार पाचवेळा निवडून येतो. मंत्री बनतो, तरी केंद्राच्या यंत्रणांना माहीत नाही पोकळ यंत्रणा झाल्या का? टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतात का एजन्सी? या एजन्सी म्हणजे बाण आहे. हातात घ्यायचं आणि लक्ष्यावर मारायचं, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. ईडीला तुम्हीच माहिती दिली. असं वाचलं मी ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही. असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाही कोपरखिळ्या मारल्या.
हिंमत असेल तर दाऊदला घरात घुसून मारा
हा दाऊद आहे कुठे माहीत आहे कुणाला? म्हणजे एखाद्या निवडणुकीसाठी विषय किती काळ घेणार? राम मंदिराचा विषय किती काळ घेतला आधी रामाच्या नावाने मतं घेतली आता दाऊदच्या नावाने घेणार आहे का? मुंडे म्हणाला दाऊदला फरफटत आणू आता आपण दाऊदच्या मागे फरफटत जातो. ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली होती का हो? ओबामाने टॉवर पाडल्यानंतर वाट पाहिली नाही. त्याने घरात घुसून लादेनला मारलं. याला म्हणतात मारणं, याला म्हणतात मर्द पणा. दाऊदच्या घरात घुसून मारा. दाखवा हिंमत, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिलं. तसेच आम्ही देशद्रोहाच्या विरोधात आहोत. त्याबातब दुमत नाही मलिकांचा राजीनामा मागता मग काश्मीरात तुम्ही मुफ्तीसोबत बसाल? अफजल गुरूला फाशी देऊ नका असं मुफ्तीचं विधान होतं. पार्थिव कुटुंबाला द्या, म्हणाले होते. त्यावेळी सत्तेत भाजप होता. तुम्ही सत्तेचा पाट मांडला होता. त्यावेळी त्यांची मते कशी होती? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
तुमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो
सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पाहटेच्या शपथविधीचाही पुन्हा समाचार घेतला. तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नाीच विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर या, बघतो तू आहे आणि मी आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे. मागे गडकरी म्हणाले आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का? म्हैसूर साबण लावायचा बघा झाला स्वच्छ हे सर्व होतंय असं समजू नका की कोण बघत नाही. आपला पिता धृतराष्ट्र होता. तसा हा धृतराष्ट नाहीये. हा महाराष्ट्र आहे. अशा वाटेला जाऊ नका. यातून कोणाचं भलं होत नाही. मी घाबरलोय म्हणून मी बोलत नाही. ही संधी आहे. असेही इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं, परबांनी भर विधानसभेत मान्य केलं