पोलिसांच्या मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे (CM Uddhav Thackeray instructions that to start Department-wise police training centers).

पोलिसांच्या मनोबलवृद्धीसाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 4:13 PM

मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी. त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत, अशी सूचना देखील त्यांनी केली. त्याचबरोबर येत्या रविवारी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कोल्हापूर येथे  सारथीचे उपकेंद्र सुरु करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी दिली (CM Uddhav Thackeray instructions that to start Department-wise police training centers).

साताऱ्याच्या मल्हारपेठ पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत इमारतीच्या ई भुमिपुजन कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई,  गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे पोलीस गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सातारा पोलीस दलातील अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

‘पोलिसांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे सरकार’

“नागरिकांच्या घराचे आणि जीवाचे रक्षण पोलीस करतात पण त्यांच्याच घरांचे संरक्षण होणार नसेल तर त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणे अत्यंत स्वाभाविक आहे. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम दर्जाच्या आणि आधुनिक रंगसंगतीच्या पोलीस वसाहती निर्माण होणे आवश्यक आहे. पोलीसदलाच्या भावना आणि अडचणींशी मी सहमत आहे. त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे हे सरकार आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले (CM Uddhav Thackeray instructions that to start Department-wise police training centers).

‘लोकांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज पडू नये’

पोलीस स्टेशन शेजारीच पोलीस वसाहत इमारत असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिसांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन कामाचा दर्जा उत्तम राहण्यास मदत होणार आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांना जरब बसावी तर गोरगरीबांना आधार मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांना पोलीस स्टेशनला येण्याची गरजच पडू नये इतकी इथली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : ‘आम्हाला सांगा, 4 महिन्यात इम्पिरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत करु, नाही तर पदावर राहणार नाही’, फडणवीसांचं जाहीर चॅलेंज 

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.