आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली, मुख्यमंत्री-राठोड भेटीचा इतिवृत्तांत

संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याशी अवघी दोन मिनिटं जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला. | Sanjay Rathod CM Uddhav Thackeray

आधी दीड तास ताटकळत ठेवलं आणि नंतर दोन मिनिटांची भेट दिली, मुख्यमंत्री-राठोड भेटीचा इतिवृत्तांत
संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यग्र होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच काळ वाट पाहावी लागली.
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 9:01 AM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील नवे फोटो आणि व्हीडिओ समोर आल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून संजय राठोडांचा (Sanjay Rathod) राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वाढली आहे. संजय राठोड हे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याशी अवघी दोन मिनिटं जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला.

संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यग्र होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच काळ वाट पाहावी लागली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत हेदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र, संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबाबत माहिती नाही. मात्र, एकूणच घटनाक्रम पाहता आगामी काळात शिवसेना नेतृत्त्वाकडून संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

संजय राठोडांसाठी शिवसेनेचं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’?

पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत आता शिवसेनेनं (Shivsena) खास ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हे नागपूरचे संपर्कमंत्री आहेत. तरीही संजय राठोड यांच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे.

उद्धव ठाकरेंवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव

काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री खासगीत संजय राठोड विषयावरून नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. संजय राठोड शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सीएम ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दबाव निर्माण केलाय. संजय राठोडप्रकरणी मुख्यमंत्री अधिवेशन सुरू होण्याआधी निर्णय घेतील, अशी अपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलंय. सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली, पण या बैठकीत संजय राठोड यांच्याविषयी कोणतीच चर्चा झालेली नाही. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संजय राठोड प्रकरणात शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.