CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 9:16 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्याचं आवाहन केलं. तसेच कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करावं, असंही आवाहन केलं. यावेळी आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली. ते आज (22 नोव्हेंबर) समाजमाध्यमांद्वारे (CM Uddhav Thackeray addressing Maharashtra) राज्यातील जनतेशी संवाद साधत होते (CM Uddhav Thackeray addressing Maharashtra on Corona).

उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे.”

“मी तुमच्यावर नाराज आहे. अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे. गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

“सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही, पण सावध राहा यानंतर येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता”

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आगामी कोरोना साध त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.”

“आपण एका वळणावर आलेलो आहोत. पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही. आपण एका वळणावर असल्याने आपल्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. व्हॅक्सीन येईल तेव्हा येईल, सध्या आपण काळजी घ्यायला हवी,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

CM Uddhav Thackeray LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

मिशन मुंबई, उद्धव ठाकरेंची सलग दुस-या दिवशी बैठक, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं

Kartiki Gaikwad | लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ‘लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड थेट ‘वर्षा’वर!

संबंधित व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray LIVE comment on Corona Festivals Health and other issues

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.