Cm uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवाल

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्वावरून आणि मशीदीवरील भोंग्यावरून जो गदारोळ सुरू आहे, आणि राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे खरमरीत पत्र लिहिले आहे. त्याच्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या सभेतून पलटवार करण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या या सवालांना मुख्यमंत्री जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत.

Cm uddhav Thackeray Live  : उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवाल
उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 3:50 PM

मुंबई : आज मुंबईतील बीकेसीतील मैदान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Cm Uddhav Thackeray) सभेसाठी सज्ज झालं आहे. आता मुख्यमंत्र्यांची सभा म्हटल्यावर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटणार नाहीत असं होणारच नाही. या सभेवरून आता भाजप नेते शिवसेनेला (Shivsena) घेरण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी भाजप आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रश्नांचा पंच दिला. तर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या सभेआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवेसनेला चार सावल केले आहेत. तसेच राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्वावरून आणि मशीदीवरील भोंग्यावरून जो गदारोळ सुरू आहे, आणि राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे खरमरीत पत्र लिहिले आहे. त्याच्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या सभेतून पलटवार करण्याची शक्यता आहे. तसेच भाजपच्या या सवालांना मुख्यमंत्री जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत.

नितेश राणेंचे टार सवाल काय?

मा.मु.उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील खालील प्रश्नांचे उत्तर देणार का? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार?आता आम्हाला ‘हे पाहायचंच’.@CMOMaharshtra अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलंय.

नितेश राणे यांचे चार सवाल

  1. महाराष्ट्रातील हिंदूना धमकी देणाऱ्या व औरंगजेबाचा उथोडथो करणाऱ्या ओबीसीवर गुन्हे दाखल करून अटक करणार का?
  2. महाराष्ट्रात निर्माण झालेला अतिरिक्त ऊसाचं गाळप करून ऊस उत्पादक शेतकन्यांना न्याय देणार की कारखानदारांचा बचाव करणार?
  3. हे सुद्धा वाचा
  4.  शेतकऱ्यांचा पीक विमा बुडवणाऱ्या पीक बीमा कंपन्यांवर कारवाई करणार का?
  5. महाविकास आघाडी ससेत आल्यावर मेगा नोकर भरतीची घोषणा ही फक्त बेरोजगार युवकांसाठी गाजर होती असे मान्य करणार का?

भातखळकरांचे पाच सवाल काय?

  1. ही फक्त भाजप द्वेषाची गरळ ओकणारी सभा की जनतेच्या प्रश्नांची उत्तर देणार ?
  2. उमर खालीद, शरगील उस्मानी आणि आता अकबरूद्दीन ओवैसी यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात ? उमर खालीदची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली अकबरूद्दीन ओवैसीवर तात्काळ गुन्हा दाखल करणार का ?
  3. तर पक्षप्रमुख म्हणून बोलणार की मुख्यमंत्री म्हणून बोलणार ? आणि मुख्यमंत्री म्हणून बोलणार असाल तर मुंबई मेट्रोच काय झाल?
  4. अजान स्पर्धा, टिपू सेना, उर्दू विशेष वर्ग हे सगळ हिदुत्वाच्या व्याख्येत बसत का ?
  5. तर गेल्या अडीच वर्षात सामान्य नागरिकांसाठी काय केल? हे ही सभेत सांगावं, उद्याच्या सभेनंतर तरी आठवड्यात चार वेळा मंत्रालयात मुख्यमंत्री जाणार का ?
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.