मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उच्च न्यायालयात का दाखल झाले याचं कारणं अद्याप कळलेलं नाही. सध्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याबाबत हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करु शकतात. याशिवाय राज्यातील कोरोना परिस्थिती याबाबातही चर्चेची शक्यता आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक उच्च न्यायालयात का आले? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (cm uddhav thackeray reached at mumbai high court)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी यांच्यासोबत उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहलही उपस्थित असल्याचं समजतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11.30 च्या सुमारास हायकोर्टात दाखल झाले. प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्र्यांची किंवा कोणत्याही मंत्र्यांची भेट घेऊ शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री हे प्रोटोकॉलनुसार मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊ शकतात. तब्बल अर्ध्या तासापासून मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू असून नेमकी कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
आज मुख्यमंत्र्यांचे दोन मुख्य कार्यक्रम होते. सकाळी 11.30 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वर्षा निवासस्थानी महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण करणे आणि दुपारी 1.30 वाजता उस्मानबाद साखर कारखान्याचं दृश्यप्रणाली द्वारे उद्घाटन करणे आदी दोन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत होते. मात्र, महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केल्यानंतर त्यांचा थेट ताफा कोर्टात आल्याने कोर्टातील कर्मचारी आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली.
या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्यात कोरोना लसीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसापासून कोर्टात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिल्याचं समजतं. या भेटीत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायाधीशांशी मराठा आरक्षणावरही चर्चा केल्याचं सांगण्यात येतं. राज्याकडे मराठा आरक्षणाबाबत कोणते कायदेशीर पर्याय आहेत? आणि मराठा आरक्षणाबाबत कोणत्या मुद्द्यावर फोकस दिला पाहिजे, यावरही या भेटीत चर्चा झाल्याचं समजतं. मात्र, त्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. (cm uddhav thackeray reached at mumbai high court)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 14 May 2021 https://t.co/vqDanFY6Yv #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2021
संबंधित बातम्या:
(cm uddhav thackeray reached at mumbai high court)