VIDEO: याला तर अक्करमाशीपणा म्हणतात, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

कुणाच्या कुटुंबावर वैयक्तिक, पत्नीवर मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. या नामर्द किंबहूना अक्करमाशीपणा म्हणतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. (cm uddhav thackeray slams bjp at shivsena dasara melava)

VIDEO: याला तर अक्करमाशीपणा म्हणतात, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 8:51 PM

मुंबई: कुणाच्या कुटुंबावर वैयक्तिक, पत्नीवर मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. या नामर्द किंबहूना अक्करमाशीपणा म्हणतात, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यात तपास यंत्रणांकडून टाकण्यात येत असलेल्या धाडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. आजसुद्धा मी काय बोलणार कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बऱ्याच दिवसांनी बोलतोय. एकतर मनामध्ये विषयांची गर्दी झालीय. पण पंचायत अशीय की कोरोनामध्ये गर्दी झालीय. बरं गर्दीमध्ये दोन लसी घेतल्यात का रे बाबा? असं विचारु शकत नाही. मास्क कसा घालणार विचारणार. पण तरी मला हेही माहिती आहे माझ्या भाषणानंतर अनेकजण माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी याची वाट पाहत आहेत. काही लोक तोंडामध्ये बोळकं घालूनच बसले आहेत. माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी. चिरकू द्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मी त्यांच्याशी बोलत नाहीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही

केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला. त्याच्यावर आरोप करताय. मागेही सांगितलं आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. पण ती आमची राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीची पालखी आहे. हिंदुत्वाची पालखी आहे. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून? वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. ही जी काही थेरं सुरू आहेत ते हिंदुत्व नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दिल्लीच्या तख्ताला हर हर महादेव दाखवू

हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण दाखवायची वेळ आली तर दाखवावीच लागेल. हा सत्ता पिपासूपणा नाहीये? यात कोणता विचार आहे. मला दु:ख, राग का येतो? तोंडामध्ये बोळकं घालून बसले असतील हे शिवसेनेला बदनाम करणारे लोकं. 92-93मध्ये शिवसेना रस्त्यावर उतरली नसती तर तुम्ही कुठे असता? असा सवालही त्यांनी केला.

उपटसुंभांपासून हिंदुत्वाला धोका

केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं हिंदुत्वाला धोका नाही. याच तर दिवसाची आणि क्षणाची वाट पाहत होतो. पण आता हिंदुत्वाला धोका आहे. तो परक्यांपासून नाही तर हे उपटसुंभ नव हिंदू उगवले आहेत त्यांच्यापासून हा धोका आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

गांधी आणि सावरकर तरी समजले का?

सावरकर शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का? गांधी हा शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का? गांधी आणि सावरकर तरी समजले का? असा सवाल करतानाच मी दोन वर्षापूर्वी बोललो होतो. माय मरो आणि गाय जगो हे आमचे हिंदुत्व नाही. त्यावेळी गहजब माजला होता. झुंडबळी झुंडबळी अशी बोंब ठोकली. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत. मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट

Uddhav Thackeray LIVE : तर मी राजकीय जीवनातून बाहेर पडलो असतो, ‘त्या’ दगाबाजीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Shivsena Dussehra Melava 2021 | कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या उद्धव ठाकरेंना प्रत्येक जन्मात हव्यात?

(cm uddhav thackeray slams bjp at shivsena dasara melava)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.