Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं, नाही तर लोक स्वत:साठी मागतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. (cm uddhav thackeray taunt narayan rane over medical college)

तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं, नाही तर लोक स्वत:साठी मागतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 1:49 PM

मुंबई: बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं. नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. (cm uddhav thackeray taunt narayan rane over medical college)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राणेंना हा टोला लगावला. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. नारळ फोडतात आणि पुढे काम होत नाही. पण आपल्या सरकारकडून तसं होणार नाही. ज्या योजना होणाऱ्या असतात त्याचीच आपण घोषणा करतो. त्यामुळे आता या योजनांचा शुभारंभ झालाय. त्या आपण पूर्ण करणार आहोत. या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: त्याचं उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.

तोपर्यंत शब्द देणार नाही

आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही मागणी करत नाही. तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितलं. तुम्ही स्वत:साठी काही मागितलं असतं. पण तुम्ही ते केलं नाही. काही लोकं असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितलं नाही, असा टोला त्यांनी राणे यांना नाव न घेता लगावला. मी आजही मेडिकल कॉलेजची घोषणा करू शकतो. पण मला खोटं बोलता येत नाही. पण कोकणात कॉलेज करायचं हे माझ्या लक्षात आहे. जोपर्यंत हे काम करू शकतो की नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हाल शब्द देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

केवळ घोषणा करणार नाही

मी कोणत्याही योजनांच्या केवळ घोषणा करणार नाही. ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच घोषणा मी करेल. ज्या घोषणा करेल त्या पूर्णही करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

वर्क फ्रॉम होम करा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या. कोरोना होऊ नये म्हणून जी त्रिसूत्री आहे ती पाळा. शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांना मात्र ऊन-पावसात काम करावं लागतं. कोरोनाच्या काळातही बळीराजा शेतात राबला. बळीराजा नसता तर आपली अवस्था खूप वाईट झाली असती असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. (cm uddhav thackeray taunt narayan rane over medical college)

संबंधित बातम्या:

चंदनाची शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा; विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान? वाचा स्पेशल रिपोर्ट

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसं द्यावं? शिवसेनेला प्रश्न

(cm uddhav thackeray taunt narayan rane over medical college)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.