शिवसेनेची सोमवारपासून ‘शिवसंपर्क मोहीम’, आघाडी-युतीची चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांनी शाखाप्रमुखांना दिले ‘हे’ आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून 'शिवसंपर्क' मोहीमेची घोषणा करण्यात आली. (cm uddhav thackeray)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिष, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संवाद यात्रा सुरू असतानाच आता शिवसेनेनेही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसन आणि भाजपनेही जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या शिवसंपर्क मोहिमेला अधिक महत्त्व आलं आहे. (cm uddhav thackeray to launch ‘Shiv Sampark Abhiyan’ In across the state)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेअंतर्गत “माझं गाव, करोना मुक्त गाव” करण्यासाठी शाखाप्रमुखांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण झालं की नाही याची माहिती घ्यावी. इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहीती घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जातं.
तुम्ही आघाडी-युतीची चिंता करू नका
‘तुम्ही आघाडी किंवा युती होणार का…? याची चिंता करू नका… तुम्ही फक्त जनतेची कामं करा… कोविड-19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलंत. अशीच चांगली कामं पूढेही करत रहा. शाखाप्रमुखांनी प्रत्येक गाव करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत… सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहिजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा… मी तुमच्या पाठी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
निवडणुकीची पूर्वतयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्याती जिल्हाप्रमुखांची भेट घेतली. दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागाची बैठक घेतली. गेल्या फेब्रुवारीत शिवसेनेची शिव संपर्क मोहीम जाहीर करण्यात आली होती. ती जाहीर केल्यावर काही दिवसातच कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आली. ही लाट काही प्रमाणत ओसरते आहे किंबहुना नियंत्रणात आहे. त्यामुळे आम्ही ही मोहीम पुन्हा सुरू करत आहोत. जिल्हा परिषद, महानगर पालिका, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची पूर्व तयारी, चाचपणी या संपर्क मोहिमेद्वारा करण्याचं ठरवलं आहे. येत्या 12 जुलै ते 24 जुलै पर्यंत ही मोहीम राबवली जाईल. त्यानंतर त्याचा अहवाल शिवसेना भवनात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल, असं शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी सांगितलं.
नंतर त्याचा अहवाल शिवसेना भवन मध्ये शिवसेना प्रमुख यांच्या कडे देण्यात येईल. यासोबत माझं गाव, कोरोना मुक्त गाव हे अभियान मुख्यमंत्र्यांनी दिलं होत. ते गाव पातळीवर पोहचविण्याचे कार्य शिवसैनिक करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना कोणत्याही निवडणुकीला तयार
आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. गाव स्तरापर्यंत संघटनेची बांधणी मजबूत व्हावी या हेतूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले. शिवसंपर्क हे जे अभियान सुरू होत आहे, या अभियानाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न आणि संघटनेची बांधणी करण्यात येणार आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावरचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येणार आहे, असं शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. शिवसैनिक कधीही कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो यामुळे कोणत्याही तयारीची आवश्यकता नाही. शिवसैनिकांना कार्यक्रम देण्याची गरज नाही. कारणशिवसैनिक चोवीस तास काम करत असतात, असंही त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray to launch ‘Shiv Sampark Abhiyan’ In across the state)
VIDEO | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 8 July 2021https://t.co/TC1KjZDt3S
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2021
संबंधित बातम्या:
मुंडे भगिनी नाराज नाहीत तर अभिनंदनाचं एक ट्विट का नाही? फडणवीस म्हणाले, बदनाम करू नका? वाचा सविस्तर
ईडीच्या चौकशीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, खसडेंनी चौकशीला सामोरे जावे: प्रवीण दरेकर
Maharashtra News LIVE Update | गावा-गावात शिव संपर्क मोहिम राबवा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश
(cm uddhav thackeray to launch ‘Shiv Sampark Abhiyan’ In across the state)