Uddhav Thackeray Delhi Visit : नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या, मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी

नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहेत. नक्षलवाद क्षेत्राच्या विकासकामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Delhi Visit : नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या, मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी
अमित शाह आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 2:11 PM

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी हा निधी केंद्राने द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. या निधीतून नक्षलग्रस्त भागांचा जास्तीत जास्त विकास करता येईल, नव्या संकल्पणा राबविता येतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती लावली. सकाळी 10 वाजता सुरु झालेली बैठक दुपारी 1.30 वाजता संपली. नक्षलवाद क्षेत्राच्या विकासकामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला सहभाग नोंदवला.

उद्धव ठाकरेंच्या मागण्या काय?

उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासमोर एक विशेष सादरीकरण केलं. या सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी राज्याला 1200 कोटींचा निधी देण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली. जर दुर्गम नक्षलवादी भागांत विकास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात निधी लागेल, याकामी राज्याला केंद्राने मदत करावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा. दुर्गम भागात नवीन पोलिस पोस्ट स्थापन करणार. मोबाईल टॅावर जास्तीत जास्त बसवण्यात येतील. नवीन शाळा स्थापन करण्यावर भर दिला जाईल, अशा प्रकारचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर आपल्या सादरीकरणातून मांडल्या.

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक पार पडली. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर बैठकीत चर्चा झाली. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान वर्षाहून दिल्लीला जाण्यासाठी भल्या सकाळीच रवाना झाले. दिल्लीत सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते पोहोचले. 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विज्ञान भवनात पोहोचले. ठाकरेंसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही वेळेत उपस्थिती होते. पावणे दहाच्या सुमारास विज्ञान भवनात अमित शहांचं आगमन झालं आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.

(CM Uddhav thackeray Visit New Delhi Today Union Minister Amit Shah Called meeting over Naxalism live Updates)

हे ही वाचा :

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.