Modi-Thackeray meet: उद्धव ठाकरे दिल्लीत मोदींची भेट घेणार; अजितदादा, अशोक चव्हाणही सोबतीला

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. | Modi-Thackeray meet

Modi-Thackeray meet: उद्धव ठाकरे दिल्लीत मोदींची भेट घेणार; अजितदादा, अशोक चव्हाणही सोबतीला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 7:41 AM

मुंबई: मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. काहीवेळापूर्वीच उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) मातोश्रीवरुन निघाले असून थोड्याचवेळात ते दिल्लीत दाखल होतील. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे त्यांच्यासोबत असतील. (PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray meet in Delhi)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. कोरोनाशी सामना करत असताना राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. त्यामुळेही या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावर तासभर खलबतं

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नती आरक्षणासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत पुढील मुद्दे मांडू शकतात?

1) मराठा आरक्षण

2) जीएसटी परतावा

3) नैसर्गिक आपत्तीनंतर मदत व पुनर्वसनातील NDRF च्या निकषात सुधारणा

4) महाराष्ट्राला केंद्राकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्यात वाढ करण्यात यावी.

5) पंतप्रधान मोदी हे या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतंत्रपणे एकांतात संवाद साधू शकतात. यावेळी काही राजकीय विषयांवर चर्चा होऊ शकते. एकांतात होणाऱ्या मोदी-ठाकरे भेटीबाबत अद्याप अधिकृत दुजोरा नाही.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे मोदींना भेटणार तर मराठा आरक्षणाचा मार्ग खरंच मोकळा होणार?; वाचा सविस्तर

उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावर तासभर खलबतं, नेमकी चर्चा काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

(PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray meet in Delhi)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.