हायप्रोफाईल वस्तीत घरात कोब्रा घुसला, कुटुंब प्रचंड घाबरले, पण त्या श्वानाने…

Mumbai News: घरात कोब्रा आल्याची चाहूल लगताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला. त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले. त्यानंतर कोब्रा आणि श्वानाची झुंज सुरु झाली. अखेर या झुंजीत कुत्र्याचा मृत्यू झाला.

हायप्रोफाईल वस्तीत घरात कोब्रा घुसला, कुटुंब प्रचंड घाबरले, पण त्या श्वानाने...
कल्याणमध्ये घरात निघालेला कोब्रा
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 11:31 AM

सुनील जाधव, मुंबई | दि. 10 मार्च 2024 : बदलत्या हवामानामुळे विषारी आणि बिनविषारी साप भक्ष्यासह थंड जागेच्या शोध घेतात. यावेळी अनेकवेळा साप सरळ मानवी वस्तीत शिरतात. यासंदर्भातील घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईजवळील कल्याणमध्ये हायप्रोफाईल भागातील वस्तीत एका बंगाल्यामध्ये विषारी असलेला कोब्रा नाग घुसला. घरात कोब्रा आल्याची चाहूल लगताच घरातील पाळीव कुत्रा सावध झाला. त्याने आपल्या मालकाच्या कुटुंबावर आलेले संकट ओळखले. त्यानंतर कोब्रा आणि श्वानाची झुंज सुरु झाली. अखेर या झुंजीत कुत्र्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत सर्पमित्रास बोलवण्यात आले होते. सर्पमित्राने नागाला पकडून जंगलात सोडले.

कल्याणमध्ये कुठे घडला प्रकार

कल्याण पश्चिमेकडील गोदरेज हिल या हायफ्रोफाईल परिसरात स्वप्ननगरी येथे मॅथ्यूज यांचा बंगला आहे. या बंगल्यात मॅथ्यूज यांच्या कुटुंबासह डॉबरमन जातीचा पाळीव कुत्रा गेल्या दोन वर्षांपासून राहत आहे. या कुत्र्यावर मॅथ्यूज कुटुंब आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारखे त्याचे पालन-पोषण करत असतात. शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मॅथ्यूज यांच्या बंगल्यात चार फुटाचा कोब्रा नाग शिरला. नागाला पाहून कुत्रा आक्रमक झाला. त्याने कोब्र्याला बंगल्यात येण्यास जोरदार प्रतिबंध केला. दोघांची झुंज झाली. मात्र बांधलेला असल्याने कुत्र्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.

कुटुंबातील सदस्यांनी सर्पमित्रास बोलवले

कुत्र्याच्या आवाजामुळे कुटुंब धावत आले. कुत्रा आणि नागाची झुंज पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. परंतु कुत्रा बांधलेला असल्यामुळे त्याला मर्यादा आला. या लढाईत विषारी असलेल्या कोब्राने नागाने कुत्र्याला दंश केला. नागाचे विष शरीरात भिनल्यानंतर कुत्र्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तोपर्यंत मॅथ्यूज यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला होता. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी बंगल्यात फणा काढून बसलेल्या कोब्र्याला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. नाग पडकल्याचे पाहून बंगल्यातील मॅथ्यूज कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हे सुद्धा वाचा

कोब्रा हा आशिया खंडात आढळणारा विषारी साप आहे. हा साप ओफिओफॅगस वंशाचा एकमेव सदस्य आहे. जगातील सर्वात लांब विषारी साप आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.