Breaking : राज्यातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दिलासा मिळणार; नवीन पर्यायी धोरणासाठी समिती गठीत
तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेऊन नवीन पर्यायी धोरण सरकारला सुचवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं 6 सदस्यांची समिती गठीत केली आहे.
मुंबई : राज्यातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेऊन नवीन पर्यायी धोरण सरकारला सुचवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं 6 सदस्यांची समिती गठीत केली आहे. ही समिती राज्य सरकारला दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. (Committee formed by the Department of Higher and Technical Education to solve the problems of professors)
पुण्यातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी आपल्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता 6 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे तासिका तत्वावरील प्राध्यापकांचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला
शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.
दोन वर्षानंतर परीक्षा
शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा तब्बल दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. 2018-19 मध्ये शेवटची परीक्षा झाली होती.
परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी 7 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे 10 लाख यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.
दिनांक १२/०८/२०२१ ते दिनांक १६/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात येत आहे.
— Uday Samant (@samant_uday) August 10, 2021
इतर बातम्या :
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची संधी केंद्राने गमावली : अशोक चव्हाण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा तीन दिवसीय पुणे दौरा, स्वातंत्र्यदिनी पुण्यातच झेंडावंदन करणार
Committee formed by the Department of Higher and Technical Education to solve the problems of professors