पश्चिम रेल्वेच्या अंधेरी यार्डात क्रॉसओव्हरचे काम पूर्ण, असा होईल लाभ
पश्चिम रेल्वेने त्यांच्या अँधेरी यार्डात दोन क्रॉसओव्हरची उभारणी करण्याचे काम पूर्ण केले आहे. याकामामुळे आपातकालीन परिस्थितीत धिम्या डाऊन लोकलना डाऊन फास्ट मार्गिकेवर वळविणे सोपे होणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेने अंधेरी यार्डात क्रॉसओव्हर लावण्याचे महत्वपूर्ण अभियांत्रिकी कार्य पूर्ण केले आहे. त्यामुळे जम्बो ब्लॉक दरम्यान गाड्यांचे परिचलन करण्यास फायदा होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांचा फायदा होईल असे म्हटले जात आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनने अंधेरी यार्ड येथे क्रॉसओव्हर बसवण्याचे काम पूर्ण केले आहे.
हे अभियांत्रिकी कार्य 34 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वेकडून विशिष्ट मंजूरी घेण्यात आली होती. डाऊन लोकल लाईनपासून फास्ट लोकल लाईन मार्गावर लोकल एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वळविण्यासाठी एकूण दोन क्रॉसओव्हर तयार करण्यात आले आहेत. या दोन क्रॉसओव्हरची चाचणी ताशी 30 किमी प्रति वेगावर 11 व 12 जानेवारीला घेण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क प्रमुख सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानूसार नवीन क्रॉस ओव्हर सांताक्रुज (उत्तर) आणि गोरेगांव (दक्षिण) च्या दरम्यान अतिरिक्त डायव्हर्जन सुविधा ( डाऊन लोकल लाइन ते डाऊन फास्ट लाइन ) उपलब्ध करणार आहेत. ज्याने जम्बो ब्लॉकदरम्यान परिचालन सुधारण्यास मदत मिळणार आहे. 30 किमी प्रती तासांच्या या दोन्ही क्रॉसओव्हरमुळे लोकल ट्रेनचे त्वरीत वाहतूक करण्यास सहाय्य मिळणार आहे. या महत्वपूर्ण कामामुळे लोकल ट्रेनच्या वाहतूकीचे परिचलनात सुधार होणार आहे.