आमचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरलाय, अधिवेशन एक दिवसाने वाढवा; काँग्रेसची मागणी

| Updated on: Mar 09, 2021 | 1:15 PM

आमचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे. (congress demand maharashtra assembly speaker election in session)

आमचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरलाय, अधिवेशन एक दिवसाने वाढवा; काँग्रेसची मागणी
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई: आमचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी एका दिवसाने वाढवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (congress demand maharashtra assembly speaker election in session)

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात निर्णय होईल. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडला जावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक दिवसाने अधिवेशन वाढवावे अशी आमची मागणी आहे, असं सांगतानाच आमचा अध्यक्षपदाचा उमेदवारही ठरलेला आहे, असं पटोले म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही भाष्य केलं आहे. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बजेटमध्ये तरतूद करायला हवी होती, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बिनविरोध निवड व्हावी

विधानसभा अध्यक्ष याच विधीमंडळ कामकाजात निवडला जावा आणि तो बिनविरोध व्हावा यासाठी आमची सर्वाशी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांबरोबर ही चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हायकमांडचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाण नवे विधानसभा अध्यक्ष?

विधानसभा अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच संसदीय कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. शिवाय ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून चव्हाण यांना हे पद देण्याचं घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, चव्हाण यांचं नाव आल्यास त्याला राष्ट्रवादीकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चव्हाण आणि राष्ट्रवादीचं फारसं पटलेलं नाही. त्यामुळे चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष झाल्यास ते भविष्यात डोईजड होऊ शकतात, त्यामुळे चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीने विरोध केल्याचं सांगितलं जातं.

आमदारांची टेस्टच नाही

दरम्यान, बऱ्याच आमदारांनी कोविड चाचणी केली नाही. त्यामुळे या आमदारांना काल अधिवेशनात बसता आले नव्हते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (congress demand maharashtra assembly speaker election in session)

 

संबंधित बातम्या:

मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू; अस्लम शेख यांचे संकेत

तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात; अमृता वहिनींच्या गाण्यावर रोहित पवारांची टिप्पणी

Maharashtra budget session day 7 Live | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची शक्यता मावळली

(congress demand maharashtra assembly speaker election in session)