AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन टॅपिंगचे आदेश देणारे ‘बिग बॉस’ कोण? गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज-काँग्रेस

महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे त्यांचे ‘बिग बॉस’ कोण आहेत? याचाही शोध घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Congress leader Atul Londhe) यांनी केली. आहे.

फोन टॅपिंगचे आदेश देणारे ‘बिग बॉस’ कोण? गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज-काँग्रेस
अतुल लोंढेंची चौकशीची मागणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 4:11 PM

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी (Phone Tapping) आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे त्यांचे ‘बिग बॉस’ कोण आहेत? याचाही शोध घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Congress leader Atul Londhe) यांनी केली आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह काही अधिकारी यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. 2019 सालीही राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन दोन महिने टॅप केल्याचे उघड झाले आहे. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय.

काँग्रेसची कारवाईची मागणी

मुंबईच्या कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये रश्मी शुक्ला यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. फोन टॅपिंगचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून रश्मी शुक्ला यांनी आणखी कोणा-कोणाचे फोन टॅप केले आणि कोणाच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी हे बेकायदेशीर कृत्य केले हे उघड होणे गरजेचे आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची व्याप्ती व्यापक असल्याचे दिसते त्यासाठी तातडीने कारवाई करुन रश्मी शुक्ला यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

गुजरात मॉडेल उपटून टाका

फोन टॅप करने हे व्यक्तीस्वातंत्र्यांचे उल्लंघन असून एखाद्या व्यक्तीवर अशापद्धतीने पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल लोकशाहीसाठी घातक आहे. तत्कालीन राज्य सरकारमधील मोठ्या पदांवरील व्यक्तींच्या आशिर्वादाशिवाय रश्मी शुक्ला एवढे धाडस करणार नाहीत असे वाटते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली तर रश्मी शुक्लांचा बीग बॉस कोण हेही महाराष्ट्राला कळेल व या संपूर्ण प्रकरणातील खरे चेहरे उघड होतील. लोकांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल मुळासकट उखडून फेकण्याची गरज असून सरकारने यासाठी तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे असे लोंढे म्हणाले.

Aurangabad | भाजपचे संजय केणेकर यांची म्हाडाच्या सभापतीपदी फेरनिवड, कोर्टाचे आदेश काय?

आधी मुख्यमंत्री असताना आणि नंतर गोव्याचे प्रभारी असताना फोन टॅपिंगचा आरोप, आता फडणवीसांचं थेट उत्तर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीका

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.