Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पडद्यामागे हालचाली, ‘अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार’, खळबळजनक दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींवर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक कुटुंबासह दिल्ली दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | पडद्यामागे हालचाली, 'अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार', खळबळजनक दावा
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 9:36 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे 10 ऑगस्टच्या आत मुख्यमंत्री होतील, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबियांसह पंतप्रधानांना भेटले. ही त्यांची फेअरवेल पार्टी तर नव्हती ना? कारण नवीन पद मिळाल्यावर अशी भेट होते. आता भेटण्यामागे काहीच कारण नव्हते”, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना केलं. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यास भाजप राज्यात तयारी नाही. त्यामुळं अजित पवारांना मुख्यमंत्री करून त्यांच्या नेतृत्वात लोकसभेसाठी ते सामोरे जातील, असं माझं आकलन आहे , हा एक जुगार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

’10 ॲागस्टपर्यंत राज्याच्या नेतृत्वात बदल होईल’

“उद्यापासून 10 ॲागस्टपर्यंत राज्याच्या नेतृत्वात बदल होईल. कारण 11 मे ते 10 ॲागस्ट हा तीन महिन्यांचा कालावधीत सुप्रीम कोर्ट निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल. त्याआधी किंवा त्यानंतर हे घडणार. असं माझं आकलन आहे”, असा धक्कादायक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवार मुख्यमंत्री होणार याची चर्चा अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या विधानानं सुरु झाली होती. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांची इच्छा असल्याचं विधान अनिल पाटील यांनी केलंय. तर अशा दाव्यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीतच उलट अडचणीत येणार, असं उत्तर शिंदे गटाच्या शिरसाटांनी दिलंय.

हे सुद्धा वाचा

अनिल पाटील नेमकं काय म्हणाले?

“अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही आमदार अमोल मिटकरीच नव्हे , तर गलीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. आमची सुद्धा इच्छा आहे. पण त्यासाठी आमदारांचा 145 चा आकडा गाठावा लागतो. तो आकडा जर गाठला तर राष्ट्रवादीकडून अजित दादाचं मुख्यमंत्री होतील. आता आमच्याकडे तो आकडा नाही, म्हणून शिंदे साहेबांच्या पाठीमागे आम्ही उभे असून सरकार सुरू आहे”, असं आमदार अनिल पाटील म्हणाले.

संजय शिरसाट यांचं अनिल पाटील यांना प्रत्युत्तर

अनिल पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल पाटील असतील किंवा त्यांचे आणखी कोणी नेते जी वक्तव्यं करत आहेत त्यामुळे अजित पवार अडचणीत नक्की येतील. मुख्यमंत्री तर होणार नाहीत पण अडचणीत येतील, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

पवार-फडणवीस यांची आमदारांना महत्त्वाची सूचना

मात्र सत्तेतल्या आमदारांनी असे कोणतीही दावे करु नयेत, असं आवाहन फडणवीसांनी केलंय. तर खुद्द अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या नेत्यांना याबद्दल विधानं न करण्याचा इशारा दिल्याची माहिती आहे.

मविआप्रमाणेच आत्ताचंही सरकार 3 पक्षांचं आहे. सत्तेत एकत्र आल्यानंतर मविआप्रमाणेच या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून दावे केले आहेत. मात्र अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीतल्या नेत्यांची इच्छा आहे, असं विधान करुन अजित पवार गटाच्या अनिल पाटलांनी नव्या चर्चेची सुरुवात केलीय. त्यांनी प्रत्यक्ष दिल्लीतले नेते म्हणजे भाजपच्या हायकमांडकडे बोट दाखवलंय.

दुसरीकडे अजित पवार मुख्यमंत्री होतील की नाही याचं उत्तर, फक्त पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि खुद्द अजित पवार या 3 लोकांशिवाय इतर कुणाकडेही नसल्याचं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.