‘मिर्झापूर’विरोधात काँग्रेसची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, निर्मात्यांवर कारवाईची मागणी

‘मिर्झापूर’ (Mirzapur) या वेब सीरीजविऱोधात अंधेरी येथे काँग्रेसचे कार्यकर्ते भगत सिंह यांच्यातर्फे निदर्शन करण्यात आले.

'मिर्झापूर'विरोधात काँग्रेसची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार, निर्मात्यांवर कारवाईची मागणी
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 6:10 PM

मुंबई : ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या आणि दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेल्या ‘मिर्झापूर’ (Mirzapur) या वेब सीरिजविरोधात अंधेरी येथे काँग्रेसचे प्रवक्ते भगत सिंह यांच्यातर्फे निदर्शन करण्यात आले. यावेळी या वेब सीरीजमध्ये काम करणारे कलाकार तसेच दिग्दर्शक, निर्माते यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी भगत सिंह यांच्याकडून करण्यात आली. (Congress leader protest against the Mirzapur web series, demands action against Directior, Producer and Artist)

मिर्झापूर या वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या वेब सीरिजला प्रचंड लोकप्रियता लाभत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी या वेब सीरिजला विरोध होताना दिसतोय. अंधेरी येथील काँग्रेसचे प्रवक्ते भरत सिंह यांनीदेखील या वेब सीरिजला विरोध केला आहे. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना पत्र लिहून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी, मिर्झापूर या वेब सीरिजच्या माध्यमातून समाजात वाईट विचार पसरवले जात आहेत, असा दावा भगत सिंह यांनी केला. तसेच, या बेब सीरिजमध्ये इन्टीमेट सिन्स आहेत. शिवराळ भाषा आहे. या वेबसीरीजमध्ये मिर्झापूर जिल्ह्याची बदनामी करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला. भगत सिंह यांनी मिर्झापूर वेब सीरीजचे निर्माते, दिग्दर्शक तसेच अभिनेत्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली.

यापूर्वीही मिर्झापूर वेब सीरीजवर आक्षेप

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी 25 ऑक्टोबरला ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली होती. पटेल यांनी ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील टॅग केले होते. या ट्विटमध्ये ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमधून ‘मिर्झापूर’ची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मिर्झापूरच्या खासदार या नात्याने मला हे मान्य नसल्याचे म्हणत त्यांनी ट्विटरद्वारे थेट पंतप्रधान मोदींना साकडे घातले होते. (Congress leader protest against the Mirzapur web series, demands action against Directior, Producer and Artist)

संबंधित बातम्या :

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ वाद थेट कोर्टात, ‘निर्णया’कडे मेकर्सचे लक्ष!

Kangana Ranaut | ‘मिर्झापूर 2’ बघून निकिता तोमर हत्याकांड घडल्याचा दावा, कंगना रनौतची पुन्हा बॉलिवूडवर टीका!

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ पुन्हा वादात अडकण्याची शक्यता, प्रसिद्ध लेखकाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.