सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपचा मराठा आरक्षणाबाबतचा कांगावा उघड: सचिन सावंत

Sachin Sawant | केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करुनही भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करत मोदी सरकारची पाठराखण व फडणवीस सरकारने केलेली फसवणूक लपवत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपचा मराठा आरक्षणाबाबतचा कांगावा उघड: सचिन सावंत
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 7:36 PM

मुंबई: 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने हा घोळ घालून मराठा आरक्षण (Maratha Reservation) अडचणीत आणले, असा आम्ही आरोप केल्यानंतर भाजपने मात्र राज्यांचे अधिकार गेले नाहीत असा कांगावा केला. (Congress leader Sachin Sawant take a dig at BJP over Maratha Reservation)

केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल करुनही भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करत मोदी सरकारची पाठराखण व फडणवीस सरकारने केलेली फसवणूक लपवत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्याने फडणवीस सरकारचा कायदा अवैध पद्धतीने केलेला होता व त्यातून मराठा आरक्षणाला हरताळ फासण्याचे पाप भाजपचेच आहे, हे स्पष्ट झाले.

आता यानंतर आरक्षण देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असल्याने मोदी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. याकरिता तातडीने पावले उचलावीत. त्याबरोबरच इंदिरा साहनी प्रकरणात निर्धारित केलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे, त्याबाबतही घटनादुरुस्ती करावी.

राज्यांना अधिकार देण्यासाठी 102 व्या घटनादुरुस्तीत आणखी दुरुस्ती करावी लागेल. पण आता आरक्षण केंद्र थेट देऊ शकत आहे. मराठा आरक्षणाविरोधात भाजपाचे पदाधिकारी व संघ कार्यकर्त्यांना Save Merit Save Nation संस्थेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात पाठविणाऱ्या भाजपाने भूमिका स्पष्ट करावी, असे सचिन सावंत यांनी म्हटले.

मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय खुले चर्चासत्र घ्या: चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर आघाडी सरकारकडून भाजपवर हल्ला चढवला जात आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. मराठा आरक्षणावर जाहीर सर्वपक्षीय चर्चासत्र घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी या पत्रातून केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पानी पत्रं लिहिलं आहे. त्यात मराठा आरक्षणावर सरकारचं लक्ष वेधलं आहे. आरक्षणाचा निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत आरोप प्रत्यारोपांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय चर्चासत्र प्रसिद्धी माध्यमांच्या उपस्थितीत जाहीरपणे करावे. खुल्या चर्चेच्या आधारे मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी नक्की काय करावे याचा आराखडा तयार करावा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांना घेऊन पंतप्रधानांची भेट घ्या, केंद्र सरकार ऐकत नसेल तर फडणवीसांनाही सोबत न्या: मेटे

आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव; नाना पटोलेंचा आरोप

मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप

(Congress leader Sachin Sawant take a dig at BJP over Maratha Reservation)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.