मोठी बातमी … तर मी राजीनामा द्यायला तयार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान कुणाला?

माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. वरळी मतदारसंघातील निवडणुकीवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडताना दिसत आहेत.

मोठी बातमी ... तर मी राजीनामा द्यायला तयार, आदित्य ठाकरे यांचं आव्हान कुणाला?
Aaditya ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 12:00 PM

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आमने सामने उभे ठाकले आहेत. दोघांचीही एकमेकांवर टीका सुरू आहे. राज्य सरकारविरोधात जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ. ठरवू काय होतं ते, असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं असून मी राजीनामा देतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा, असं प्रति आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुगंटीवार यांना दिलं आहे.

मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं आहे. कुपरेज फुटबॉल ग्राउंड येथे हे आयोजन करणअयात आलं आहे. यावेळी रेफ्री आणि महिला कोचेसला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात ऑस्ट्रेलियाचाही सहभाग आहे. या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांना हे प्रति आव्हान दिलं. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभं करणार असेल तर आताच राजीनामा देतो. चला तयारी आहे? असा सवाल करतानाच मुनगंटीवार यांचे सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, असा चिमटाही आदित्य ठाकरे यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले मुनगंटीवार?

पोपट मेला आहे. 2-24 मध्ये निवडणुका होणारच आहे. तुमचे शिल्लक आमदार आहेत त्यांना राजीनामा द्यायाला सांगा. तिथे टेस्ट घ्या. वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. वरळीत टेस्ट करू. तुम्हाला आनंद होतोय ना… पोपट मेला की जिवंत ते वरळीत चेक करू, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.

अनेक संपर्कात

इतके आमदार खासदार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही त्यांना थांबवलंय. कारण राजीनामा दिला तर पुन्हा निवडणुकांना सामोरे जावं लागेल, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

865 गावं महाराष्ट्रात आणा

कर्नाटक सरकाच्या शपथविधीसाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कर्नाटक सीमाप्रश्न सोडवून परत यावं. महाविकास आघाडीचे नेते फक्त शपथविधीसाठी कर्नाटकात गेले नाही, तर महाराष्ट्रातील 865 गावं कर्नाटकात आहेत. ती गावं वापस मागण्यासाठी ते गेलेय. आजच हे नेते 865 गावं परत घेण्याचा आदेश घेऊन येईल, असा चिमटा त्यांनी काढला. आता कर्नाटकात काँग्रेस सरकार आलंय. त्यामुळे हे नेते सीमा प्रश्नावर बोलणार नाही. यांचा खरा चेहरा समोर येईल. हे नेते पुढील पाच वर्ष कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलणार नाहीत. आता पोपटाने आत्महत्या करावी अशी वाक्य हे नेते बोलतील, असंही ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.