रेणू शर्मांचं आणखी एक वादग्रस्त प्रकरण, ‘आधी एअरवेज अधिकाऱ्यासोबतही लगट, नंतर पोलीस तक्रार’
रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप झाला आहे.
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मांवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पोलिसांकडे हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार दिलीय. यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. मनसेचे नेते मनीष धुरीनी देखील शर्मा यांच्यावर असाच प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. हे प्रकरण ताजं असतानाच आता रेणू शर्मांचं आणखी एक प्रकरण समोर आलंय (Controversial Case of Renu Sharma allegations of Honey Trap of Airway officer).
रेणू शर्मांनी जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नावाच्या तरुणाला छळल्याचा आरोप झाला आहे. पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे माध्यमांच्या हाती लागली आहेत. यावरुन रेणू शर्मा यांनी कुरेशी यांच्यासोबत सोशल मिडीयावरून ओळख झाल्यानंतर मैत्री केली. त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि असं बरेच काही घडलं हे जवळपास 2 वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केल्याचं यातून समोर येतंय.
रिझवान कुरेशी हे जेट एअरवेज कंपनीमध्ये अधिकारी आहेत. त्यांची मे 2018 मध्ये रेणू शर्मांशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री, हॉटेलिंग आणि बरेच काही घडलं. पण जुलै 2019 अखेर रेणू शर्मा यांनी रिझवान यांच्या विरुद्ध पोलिसात विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.
पैसे मागणी आणि हनी ट्रॅपचा आरोप
दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा सोशल मीडियावरील स्टार मेकर या चायनीज अॅपवर गायनाचे काम करत होत्या. त्या अनेकांच्या संपर्कात असल्याचंही समोर आलं आहे. त्या मे 2018 ते जुलै 2019 या काळात रिझवान कुरेशी यांच्या संपर्कात होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यांच्यावर पैसे मागणी आणि हनी ट्रॅपचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे रिझवान यांच्यासोबत जे घडले तोच प्रकार हेगडे, धुरी आणि आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत घडतोय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.
रेणू शर्मा एकाचवेळी धनंजय मुंडे, भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी आणि आता हे रिझवान कुरेशी अशा इतक्या लोकांच्या संपर्कात कशा? यामागचे नेमकं गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. दुसरीकडे या महिलेने मुंडेंवर केलेल्या आरोपात काही तथ्य आहे की, मुंडेंनी खुलासा केल्याप्रमाणे हे फक्त ब्लॅकमेलिंगचेच प्रकरण आहे, अशाही चर्चा सुरु झालीय.
रेणू शर्मा यांनी आरोप फेटाळले
रेणू शर्मा यांनी त्यांच्यावर झालेल्या हनी ट्रॅपचे आरोप फेटाळले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दिल्यामुळेच आपल्याला फसवलं जातंय असा आरोप त्यांनी केल्या. तसेच आपण क्रिष्णा हेगडे यांना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिनाच्या पार्टीत भेटल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
This is motivated action of Mr. Dhananjay Munde after my complaint. I was never involved in any honey trap activity as alleged. Infact Mr.krishna Hegde started the conversation with me. He met me in birthday party of Mr. Pratap SirNaik(MLA).
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
हेही वाचा :
…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप
मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली
संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नसतो, मनसेच्या रुपाली पाटील यांचं रोखठोक वक्तव्य
Controversial Case of Renu Sharma allegations of Honey Trap of Airway officer