धनगर आरक्षणावरुन रणकंदन, अधिकाऱ्यांवर शेकणार प्रकरण? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ही मागणी

Gopichand Padalkar | जालना येथील धनगर आरक्षणप्रकरण प्रशासनाला महागात पडू शकते. निवेदन देणाऱ्या आंदोलकांना तिष्ठीत ठेवणं आणि हे प्रकरण संवेदनशीलपणे न हाताळणे अधिकाऱ्यांना अडचणीत आणू शकते. प्रकरणात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याने याप्रकरणी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली आहे.

धनगर आरक्षणावरुन रणकंदन, अधिकाऱ्यांवर शेकणार प्रकरण? भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ही मागणी
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 11:42 AM

विनायक डावरूंग, योगेश बोरसे,  मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : जालना येथील धनगर आरक्षणाप्रकरणी झालेल्या कारवाईची धग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहचली आहे. हे प्रकरण असंवेदनशीलरित्या हातळल्याने प्रशासनावर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी करण्यात येत आहे. धनगर आंदोलनकर्त्यांच्या भावना न समजून घेताच त्यांच्यावर गुन्हे नोंदवल्याने आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकाराविरोधात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्याय देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली आहे.

काय होते प्रकरण

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी समाजाचे राज्यभर आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काही ठिकाणी उपोषण सुरु आहे. या 21 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यभर निवेदन देण्यात आले. त्यात जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन देण्यात येणार होते. पण जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील खिडक्या, वाहनांची तोडफोड करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

आंदोलकांवर गुन्हे दाखल

या तडफोडीची पोलिस प्रशासनाने दखल घेतली. त्यांनी 36 जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर आता एकूणच हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात आले नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चूक केल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. जालना जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांना निवेदन देण्याच्या एक दिवस अगोदर कल्पना देण्यात आली होती. पण त्यांनी आंदोलकांना प्रतिसाद दिला नाही. आता पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी 36 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पडळकर नाराज झाले. त्यांनी याप्रकरणी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

काय आहे मागणी

याप्रकरणात 36 जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे. धनगर समाजातील आंदोलकच नाही तर काही प्रत्यक्षदर्शींवर पण गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळणाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.