मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच डबलींग रेटनं सर्वच विभागात शतक ओलांडलं आहे. संपूर्ण विभागांमध्ये कोरोना रुग्ण संख्या दुपट्टीचा कालावधी 100 दिवसांच्या पुढे गेला आहे. तर रुग्ण वाढीचा दरही निम्म्यावर अर्थात 50 टक्क्यांवर आलेला आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी ही घसरण मुंबईकरांना समाधान देणारी आहे. (Corona patient double duration over a hundred in Mumbai)
मुंबईत सध्या एकूण बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजार 087 एवढी झाली आहे. त्यातील 2 लाख 21 हजार 458 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या 19 हजार 035 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 27 ऑक्टोबरला मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 139 दिवसांवर आला आहे. तर मुंबईतील महापालिकेच्या 24 विभागांमध्ये हा दर 100 दिवसांच्या पुढे जाऊन पोहोचला आहे.
परळ, लालबाग, शिवडी या महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 296 दिवसांचा आहे. तर त्याखालोखाल कुलाबा, नरिमन पॉईंट हा ए विभाग आहे. या ए विभागात हा कालावधी 198 दिवसांचा आहे. तर कांदिवलीतील आर-दक्षिण विभागात हा कालावधी सर्वांत कमी म्हणजे 105 दिवसांचा आहे. याशिवाय रुग्ण वाढीचा सरासरी दरही आणखी कमी होऊन अर्धा टक्क्यांवर आला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी
100 ते 125 दिवस : 7 विभागात
126 ते 150 दिवस : 6 विभागात
151 ते 175 दिवस : 6 विभागात
176 ते 200 दिवस : 4 विभागात
201 च्यावर दिवस : 1 विभाग
रुग्ण वाढीचा सरासरी दर
0.50% पेक्षा कमी : 12 विभागात
0.51 ते 0.60 % : 09 विभागात
0.60 % पेक्षा जास्त : 03विभागात
इतर बातम्या –
लॉकडाऊनमुळे अपघातात मोठी घट, गेल्या 15 वर्षात सर्वात कमी नोंद
गुगल, फेसबुक आणि ट्विटरला झटका; राजकीय जाहिरातींवर बंदी, अमेरिका निवडणुकीपूर्वी दणका
VIDEO | Unlock Temples | मंदिरे उघडा अन्यथा टाळं तोडू, भाजप आध्यात्मिक समितीच्या नेत्यांचा इशारा pic.twitter.com/B6PLbGgiBG
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
(Corona patient double duration over a hundred in Mumbai)