मुंबईतील कोविड केअर सेंटरची विभागणी, कोणते रुग्ण कोणत्या ठिकाणी?

महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजार 671 वर पोहोचला (Covid Care Center Mumbai) आहे.

मुंबईतील कोविड केअर सेंटरची विभागणी, कोणते रुग्ण कोणत्या ठिकाणी?
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 12:28 AM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारच्या जवळ येऊन पोहोचला (Covid Care Center Mumbai) आहे. महाराष्ट्राचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजार 671 वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या कोरोनाबाधितांचे उपचार सुरु असलेल्या रुग्णालयांमध्ये अव्यवस्थेची चित्र दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईतील वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. रुग्णालयांवरील ताण हलका करण्यासाठी कोरोना रुग्णांसाठी खाटांमध्ये वाढ केली जात आहे.

मुंबईत वेगाने वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता महानगरपालिकेकडून कोविड केअर सेंटर 1 (Covid Care Center Mumbai) आणि कोविड केअर सेंटर 2 उभारलं जात आहे. यात सेंटरमध्ये बेडची संख्या वाढणार आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये बेडची संख्या वाढणार

कोविड केअर सेंटर 1 मध्ये 22 हजार 941 खाटांपर्यंत व्यवस्था केली जाणार आहे. यात कोरोना संशंयित रुग्ण आणि नवीन संपर्कातील रुग्ण ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

कोविड केअर सेंटर 2 मध्ये कोणते रुग्ण?

तर कोविड केअर सेंटर 2 मध्ये सौम्य लक्षणं असलेले किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण दाखल केले जातात. या ठिकाणी अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण हलका होणार आहे. कोविड केअर सेंटरची क्षमता 34 हजार 329 बेड्स इतकी केली आहे.

इतकचं नव्हे तर काही कोरोना केअर सेंटर 2 मध्ये (सीसीसी 2) ऑक्सिजन आणि आयसीयू युनिट्ची सोय करण्यात आली आहे.

टी विभागातील मिठानगर शाळेत 10 आयसीयू बेडस् उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, वरळीतील नॅशलन स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी 70 आयसीयू बेडस् उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यात 40 मॉड्यूलर तर 30 मोबाईल आयसीयू बेडस आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुल या ठिकाणच्या एमएमआरडीएच्या मैदानात 1 हजार खाटांची तर गोरेगाव येथील नेस्को मैदानावर 1 हजार 240 खाटांची क्षमता असणारी सीसीसी २ व्यवस्था उभारली जाते आहे. इथेही ऑक्सिजन आणि मोबाईल आयसीयू युनिट आहेत.

अन्य रुग्णांसाठी विशेष व्यवस्था

विशेष म्हणजे कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांसाठी महापालिकेने 7500 खाटांची व्यवस्था केली आहे. कोविड व्यतिरिक्त अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी ही व्यवस्था केली आहे.

तसेच महापालिका रुग्णालयांसह 1416 खासगी नर्सिंग होम आणि 187 दवाखान्यात या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या 27 प्रसूतिगृहात 899 खाटा आहेत. तर 17 उपनगरी रुग्णालयांत 3076 खाटा कोविडव्यतिरिक्त अन्य उपचारांसाठी राखीव ठेवण्यात (Covid Care Center Mumbai) येतील.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण

धारावीत तब्बल 31000 जण होम क्वारंटाईन, आठ दिवसात 412 पॉझिटिव्ह, दिवसभरात चौघांचा मृत्यू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.