मुंबईतून पालघर ठाण्यात पसरतोय कोरोना! धास्तावणारी आकडेवारी चिंताजनक आहे, काळजी घ्या!
यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या बघता आपण चाचण्या वाढवल्या आहेत. मुंबईतील साप्ताहिक सकारात्मकता दर राज्याच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला काटेकोरपणे चाचणी वाढविण्यास सांगितले आहे. राज्यात दररोज सुमारे 25,000 चाचण्या होत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सातत्याने कोरोनाच्या (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामध्येही पालघर आणि ठाण्यामध्ये तर कहरच झालाय. तेथील कोरोनाच्या रूग्ण संख्येत सतत वाढ आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रूग्ण संख्या 136 टक्कांपेक्षा जास्त झालीये. सोमवारी राज्यामध्ये 1,036 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये मुंबईतील (Mumbai) 676 रूग्ण आहेत. यामध्ये एक सकारात्मक गोष्ट म्हणजे एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नाहीये. आता सध्याच्या परिस्थितीत राज्यामध्ये एकूण सक्रिय रूग्ण हे 7,429 आहेत. यामुळे ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून सतत रूग्णसंख्येमध्ये (Patient) वाढ होते. राज्यात कोरोनाचे निर्बंध हटवल्यापासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे.
यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की…
यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या बघता आपण चाचण्या वाढवल्या आहेत. मुंबईतील साप्ताहिक सकारात्मकता दर राज्याच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला काटेकोरपणे चाचणी वाढविण्यास सांगितले आहे. राज्यात दररोज सुमारे 25,000 चाचण्या होत आहेत, असेही बोलताना टोपे म्हणाले. मुंबईमधील विविध कोरोना हाॅस्पीटलमध्ये 54 रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यामुळेच सध्याची हाॅस्पीटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या 219 वर गेलीये. संपूर्ण राज्यात तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच जवळपास 96 टक्के रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.
निर्बंध लादण्याची अजिबात इच्छा नाहीये…
राज्यातील कोरोनाची वाढती रूग्ण संख्या बघता निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, याबद्दल स्वत: आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, सध्याच कोणते निर्बंध लावण्याचा राज्य सरकारचा विचार नाहीये. आम्हाला जनतेवर निर्बंध लादण्याची अजिबात इच्छा नाही. यामुळेच नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावायला हवे. इतकेच नाहीतर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच कोणतेही मोठे कार्यक्रम घेताना खबरदारी घ्यायला हवी. म्हणजे सध्याच राज्यामध्ये कोरोना संदर्भातील कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.