AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार? वाचा…

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कोविड-19 लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलंय.

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार? वाचा...
BMC Corona Vaccine
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 10:26 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कोविड-19 लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार शनिवारी (10 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 आणि रविवारी (11 एप्रिल 2021) सकाळी 9 ते 5 या वेळेत होणार आहे. महानगरपालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयांमध्ये दोन दिवस हे लसीकरण सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल 2021 या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. असे असले तरी, लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला, तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे (Corona Vaccination Schedule timetable in Mumbai for two days amid vaccine shortage).

कोविड-19 लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने खासगी लसीकरण केंद्र बंद

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु कोविड-19 लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 10,11 आणि 12 एप्रिल 2021 या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. महानगरपालिकेला आज (9 एप्रिल 2021) रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा मिळणार आहे. अधिक प्रमाणात लससाठा उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित केंद्रांमध्येच पुढील दोन दिवस लसीकरण

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित लसीकरण केंद्रांमध्ये शनिवारी (10 एप्रिल 2021) रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत पहिले सत्र राहणार आहे. ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री 8 वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. रविवारी (11 एप्रिल 2021) रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.

शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयातील लसीकरणाचे वेळापत्रक

  • शनिवारी (10 एप्रिल 2021 रोजी) दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत पहिले सत्र
  • रविवारी (11 एप्रिल 2021 रोजी) सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण
  • खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 10,11 आणि 12 एप्रिल 2021 या तीन दिवशी लसीकरण होणार नाही
  • लससाठा अधिक उपलब्ध झाल्यास खासगी केंद्रातही पुन्हा सुरु करणार लसीकरण

हेही वाचा :

Corona Vaccine in Mumbai : मोठी बातमी : मुंबईतील महत्वाच्या लसीकरण केंद्रावरील लस संपली, बीएमसी अधिकाऱ्याची माहिती

Mumbai Local : मोठी बातमी, मुंबई लोकलवर पुन्हा निर्बंध घालण्याच्या हालचाली

हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे, वाचा सुधारित नियम

व्हिडीओ पाहा :

Corona Vaccination Schedule timetable in Mumbai for two days amid vaccine shortage

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.