कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड, एकाच दिवसात 11 लाख नागरिकांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत एकाच दिवसात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड, एकाच दिवसात 11 लाख नागरिकांना लस
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 7:39 PM

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने शनिवारी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखांच्या आसपास नागरिकांचे लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. (Corona Vaccine : In Maharashtra, 11 lakh people were vaccinated in single day)

दिवसाला 10 लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे आज आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले आहे. तसेच याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. विभागाच्या वतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सातपर्यंत 5200 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून 10 लाख 96 हजार 493 नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारी 11 लाखांच्याही पुढे गेली. असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी राज्यातील आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या 5 कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

शनिवारी 11 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती. त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला 9 लाख 64 हजार 460 नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला. शनिवारच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदवल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

पुण्यात कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य

पुणे (Pune) शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. अनियमित लसीकरणामुळे (Corona Vaccination) शहरात दुसरा डोस घेण्यासाठी लस अपुरी पडत आहे. त्यामुळे दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठी महापालिकेने कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या लसींचा 70 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. आज पुण्यात 188 ठिकाणी कोविशिल्ड तर 7 ठिकाणी कोवॅक्सिन लसीचं लसीकरण केलं जाणार आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही 195 केंद्रांवर लसीकरण

महापालिकेला गुरूवारी 66 हजार कोविशिल्ड आणि 6 हजार 200 कोवॅक्सिनचे डोस मिळाले होते. त्याद्वारे शुक्रवारी 195 लसीकरण केंद्रांवर लसीकरण पार पडलं. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही 195 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी 15 टक्के लस ऑनलाईन बुकिंगद्वारे उपलब्ध असेल तर 15 टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध असेल. पहिला डोस घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी 35 टक्के लस ऑनलाई उपलब्ध असेल तर 35 टक्के लस थेट केंद्रावर मिळेल. असंच लसींचं प्रमाण कोवॅक्सिनलाही लागू आहे.

पुण्यात कोरोना लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पार

जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोव्हिड लसीकरणाचा 70 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खासगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.

इतर बातम्या

राज ठाकरे माझ्यासाठी पाऊण तास उन्हात थांबले, पण उद्धव आले नाहीत; ‘तो’ किस्सा सांगताना आशिष शेलार भावूक

नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले; आता विनायक राऊत म्हणतात, राणेंना ठोकम ठोकीची सवयच

Video: मिलिंद नार्वेकरांच्या दापोलीतल्या ‘त्या’ बंगल्यावर अखेर जेसीबी, सोमय्या म्हणतात, करुन दाखवलं, पुढचा नंबर कुणाचा?

(Corona Vaccine : In Maharashtra, 11 lakh people were vaccinated in single day)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.