AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, ‘या’ पाच ठिकाणी लसीचे स्टोरेज

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत कोरोना लसीच्या स्टोरेजबाबत माहिती दिली आहे. (Corona Vaccine Storage In Mumbai)

कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज, 'या' पाच ठिकाणी लसीचे स्टोरेज
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 7:25 PM

मुंबई : कोरोनापासून मुक्त होण्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. देशातील लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचवण्याच्या जोरदार तयारी सरकारने सुरू केली आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबईतही कोरोना प्रतिबंधक लस ठेवण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. नुकतंच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत कोरोना लसीच्या स्टोरेजबाबत माहिती दिली आहे. (Corona Vaccine Storage In Mumbai)

सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लस ठेवण्यासाठी मुंबई सज्ज आहे. मुंबईतील चार प्रमुख रुग्णालयात कोरोनाची लस ठेवली जाणार आहे. यात मुंबईतील सायन, केईएम, नायर आणि कूपर अशा चार रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत 5 हजार स्के. फूट ही कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी या पाच ठिकाणी लसीची साठवणूक केली जाईल.

मुंबईत निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये 10 लाख लस स्टोअर करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी -25 ते -15 डिग्री तापमानची सुविधा करण्यात आली आहे. तसेच लसीचे स्टोरेज करण्यासाठी कांजूरमार्ग येथे मुबलक जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 50 लाखांहून अधिक लस स्टोअर करता येऊ शकतील, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

कोरोनाची लस आल्यानंतर 24 तासात आपल्याला पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देता येईल. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 8 सेंटर तयार आहेत. उद्यापर्यंत आणखी 8 सेंटर तयार होतील. तसेच घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे दोन सेंटरमध्ये काम करेल. त्यामुळे अशाप्रकारे आपले 16 सेंटर तयार होतील. दरम्यान मुंबईत जवळपास 50 सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रत्येक सेंटर 2 शिफ़्टमध्ये काम करणार आहे. (Corona Vaccine Storage In Mumbai)

बेड आणि स्टाफ

मुंबईतील कोव्हिड सेंटरमध्ये सद्यस्थितीत 75 टक्के बेड शिल्लक आहेत. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन सिस्टम देखील सज्ज आहे. रुग्ण वाढले तरी मुंबई सज्ज आहे. आपल्याकडे मुबलक स्टाफ उपलब्ध आहे.

तसेच ब्रिटनमधून नवा कोरोनाचा रुग्ण आला तरी त्यासाठी देखील पालिकेने तयारी केली आहे. सध्या 7 हजार रुग्ण आहेत. बेड रिकामे असले तरी आपण स्टाफला कायम ठेवलं आहे. कारण त्या स्टाफची आपल्याला केव्हाही गरज पडू शकते.

सर्वप्रथम लस कोणाला मिळणार?

शासकीय कर्मचारी : परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय, तंत्रज्ञ, आरोग्य सेविका, सफाई कामगार या कोरोना लढ्यात थेट सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

खासगी कर्मचारी : रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना लढ्यात थेट सहभाग आला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती, संपर्क क्रमांक महापालिकेने घेतले आहेत. (Corona Vaccine Storage In Mumbai)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील कोरोना लसींच्या स्टोरेज रुमची महापौरांकडून पाहणी, वैशिष्ट्य काय?

मुंबईत कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात, तीन स्वयंसेवकांना लस दिली जाणार

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.