मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, आज 831 रुग्ण सापडले

तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. Corona Virus Mumbai 01 june 2021

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला, आज 831 रुग्ण सापडले
Corona Virus
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 9:26 PM

मुंबईः कोरोनाची तिसरी लाट आणि ब्लॅक फंगसचं (Black fungus) थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Maharashtra lockdown) वाढवण्यात आलाय. आता त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरू असल्या तर काही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये (Red zone) आहेत. दुसरीकडे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Corona Virus Mumbai Great Relief To Mumbaikars! Today Only 831 Patients Were Found In Mumbai 1 June 2021)

मुंबई आज फक्त 831 रुग्ण सापडलेत

मुंबई आज फक्त 831 रुग्ण सापडलेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच रुग्णसंख्या एवढी खाली आलीय. तसेच मुंबईतल्या मृतांच्या आकड्यातही घसरण नोंदवली गेलीय. मुंबईत आज 23 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत आज फक्त 831 चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात.

मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 5868 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 453 दिवसांवर गेलाय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 5868 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 72 हजार 664 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत 17 हजार 328 रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत दिवसभरात 831 रुग्णांची नोंद झालीय.

राज्यात आज 14,123 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 14,123 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,123 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,61,015 झालीय.

राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 35,949 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,31,319 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,52,77,653 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,61,015 (16.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 17,68,119 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 9,315 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राला पत्र

Ratnagiri Lockdown : रत्नागिरीत 8 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन, दूध, किराणाही घरपोच मागवा!

Corona Virus Mumbai Great Relief To Mumbaikars! Today Only 831 Patients Were Found In Mumbai 1 June 2021

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.