Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनच्या नियमांमुळेच कोरोना आटोक्यात येतोय: नवाब मलिक

राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात निर्बंध आहेत तर काही जिल्हयात जास्तच निर्बंध लागू आहेत. | Nawab Malik

लॉकडाऊनच्या नियमांमुळेच कोरोना आटोक्यात येतोय: नवाब मलिक
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 2:16 PM

मुंबई: महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केल्याने हे घडल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केले आहे. (NCP leader Nawab Malik on Coronavirus situation in Maharashtra)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात निर्बंध आहेत तर काही जिल्हयात जास्तच निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होऊ, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.

‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या: मलिक

नवाब मलिक यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे. ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार; कोरोना संकटावर बोलण्याची शक्यता

Coroanvirus: गेल्या 24 तासांत देशभरात 1,00,636 कोरोना रुग्णांची नोंद, मृतांच्या संख्येत लक्षणीय घट

‘आशा’ सेविका लढवय्या, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात तुमची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री

(NCP leader Nawab Malik on Coronavirus situation in Maharashtra)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.