लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम; वाचा कारण काय?

राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. (Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

लोकल सुरू, पण बस स्टॉपवरील गर्दी कायम; वाचा कारण काय?
mumbai bus
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:23 AM

मुंबई: राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा 15 ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. अनेक बस स्टॉपवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी कायम असल्याचं चित्रं आहे. केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय पासची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बस स्टॉपवर गर्दी होत असल्याचं सांगितलं जात आहे. (Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा राज्यसरकारने दिलेली आहे. परंतु, तरी देखील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कारण मुंबईमध्ये लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकल प्रवास करता येत नाही. म्हणून हे सर्व सामान्य प्रवासी आजही बसने प्रवास करत आहेत. त्याचमुळे मुंबईमधील ठिकाणी बस स्टॉपवर लोकांची मोठी रांग दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासंदर्भात सामान्य मुंबईकरांनी प्रशासनाच्या विरोधात आपला रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे.

प्रवाशांचा आक्रोश

मुंबईतल्या शासकीय रुग्णालयामध्ये लस उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईकरांचं लसीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तीच लस कशी काय मिळते? असा सवाल देखील सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. त्यात सोबत कोव्हॅक्सीन लसीच्या दोन डोसच्या मधला जो वेळ आहे तो एक महिन्याचा आहे आणि कोव्हीशिल्ड मधील कालावधी हा 84 दिवसाचा का? या कारणामुळे देखील आमचं लसीकरण लवकर होत नाही. त्याचमुळे लोकलसेवे करता आम्ही मुकत आहोत. या सर्व संदर्भात प्रशासनाने योग्य असा निर्णय घ्यावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे, असं प्रवाशांचं म्हणणं आहे.

बोरिवली स्थानकात गर्दी नाही

दरम्यान, लसीचे दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पण आज बोरिवली रेल्वे स्थानकावर गर्दी दिसत नाही. पूर्वीप्रमाणेच स्टेशनवर सामान्य गर्दी दिसून आली. रेल्वे प्लॅटफॉर्मपासून तिकीट खिडकीपर्यंत पूर्वीप्रमाणेच लोक दिसत होते. (Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

संबंधित बातम्या:

मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही, कारण…

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच, आतापर्यंत 5 कोटी डोस दिले

18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार-पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र आवश्यक

(Coronavirus: mumbai local start but rush on bus stop)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.