मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाचा प्रभाव ओसरला; नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
Coronavirus | सध्या मुंबईत 3031 रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील रुग्ण वाढीत दिवसेंदिवस घट होत आहे. ऑक्टोबरमध्ये रुग्ण वाढीचा दर 5 ते 7 टक्के दरम्यान होता. पण आता नोव्हेंबरमध्ये मात्र हा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला असून शनिवारी तर हा दर तीन टक्क्यांवर आला.
मुंबई: दिवाळीच्या दिवसांत मुंबईकरांना दिलासा मिळाला असून अनेक महिन्यांनंतर रुग्णसंख्या 200 पेक्षा कमी झाली आहे. मुंबईत शनिवारी करोनाचे 176 नवीन रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत शनिवारी 25 हजार 431 चाचण्या करण्यात आल्या असून यात 176 नवीन रुग्ण आढळले तर 467रुग्ण बरे झाले. याबरोबरीने मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा सात लाख 57 हजार 448 असा झाला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 16 हजार 273 असा झाला असून आतापर्यंत सात लाख 35 हजार 602 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या मुंबईत 3031 रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील रुग्ण वाढीत दिवसेंदिवस घट होत आहे. ऑक्टोबरमध्ये रुग्ण वाढीचा दर 5 ते 7 टक्के दरम्यान होता. पण आता नोव्हेंबरमध्ये मात्र हा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला असून शनिवारी तर हा दर तीन टक्क्यांवर आला. सध्या मुंबईत 30 इमारती प्रतिबंधित असून एकही झोपडपट्टी आणि चाळ प्रतिबंधित नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सक्रिय रुग्णसंख्या 12 लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज
कोविड-19 महामारीच्या पहिल्या आणि दुसर्या दोन्ही लाटेचा देशात सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. अशात महाराष्ट्राने कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. केंद्राने आणि काही आरोग्य तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या शिखरावर सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख पर्यंत पोहोचू शकते. हा अंदाज, या वर्षी मार्च ते जून या कालावधीत दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जिल्हास्थरावर नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येच्या आधारावर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या यावर्षी 25 एप्रिलला- 6,98,354 एवढी नोंदवली गेली होती.
माध्यमाशी बोलतांना एन रामास्वामी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र आयुक्त म्हणाले की ,“आम्ही तिसऱ्या लाटेत 12 लाख सक्रिय रुग्णसंख्या आसेल या अंदाजानेच तयारी करत आहोत”. यापूर्वी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, कोविड टास्क फोर्सने दिवाळीनंतर तिसऱ्या लाट येऊ शकल याबद्दल सावध केले आहे. “तिसऱ्या लाटेसाठी सध्यातरी अनुकूल स्थिती नाही. राज्य टास्क फोर्सने दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत, ”ते म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; एम्सने डब्लूएचओचा दावा फेटाळला
Corona update: गेल्या 24 तासांमध्ये देशात 10,929 नवे कोरोनाबाधित; 392 जणांचा मृत्यू