अखेर रामदास कदम यांचा पत्ता कट, सुनील शिंदे, बाजोरीया यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी
शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाही केली आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बिजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई: शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाही केली आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्त कट करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.
चुरशीची लढत
तर, अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
10 डिसेंबरला मतदान
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या सात मतदारसंघांतील आठ सदस्यांची मुदत 1 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोलापूर व नगर वगळता उर्वरित सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 नोव्हेंबरला अर्ज दाखल केले जातील. 24 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत 26 नोव्हेंबर असून, 10 डिसेंबर रोजी मतदान आणि 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
कोण आहेत सुनील शिंदे?
सुनील शिंदे हे 2007मध्ये ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या निवडणुकीत 60 हजार 625 मतं मिळाली होती. तर सचिन अहिर यांना 37613 मतं मिळाली होती. 2015मध्ये त्यांच्याकडे उत्तर अमहदनगर संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
Rajhans Singh | काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला भाजपचं तिकीट, विधानपरिषदेची संधी मिळालेले राजहंस सिंह कोण आहेत? https://t.co/ljjZdvXAgP #VidhanParishad | #Maharashtra | #Mumbai | #BJP | #RajhansSingh
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या:
कणकवलीतील रिक्षाचालकांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; उद्या रिक्षा ठेवणार बंद