देशातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनी, बोरीवलीतील उपक्रम काय समजून घ्या

विधिवत अंत्यसंस्कार आता त्याच्या राहत्या ठिकाणी मुंबईत शक्य होणार आहेत. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच मोबाईल पेट अंत्यवाहिनी आहे.

देशातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनी, बोरीवलीतील उपक्रम काय समजून घ्या
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 7:22 PM

मुंबई : शहरात पाळीव आणि भटक्या प्राण्यांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेता प्रण्यांचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न निर्माण होतो. याची चिंता प्राणी प्रेमींना असते. मात्र अश्याप्रकारची सोय मुंबईत कमी ठिकाणी उपलब्ध आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. त्यांच्यासाठी विधिवत अंत्यसंस्कार आता त्याच्या राहत्या ठिकाणी मुंबईत शक्य होणार आहेत. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच मोबाईल पेट अंत्यवाहिनी आहे. प्रभाग क्रमांक 1 च्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

मृत प्राण्यांवर होणार अंत्यसंस्कार

बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनीत भारतातील पहिल्या मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनीचे उद्घाटन आज झाले. सेंट लुईस चर्चचे फादर रोनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी पेट पार्क वायएमसीए ग्राउंडजवळ वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. ही अंत्यवाहिनी पूर्णतः पर्यावरणपूरक आहे. यातील विद्युत दाहिनीत मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

या टोल फ्री क्रमांकावर साधावा संपर्क

या मोबाईल पेट अंत्यसंस्कार वाहिनीमुळे दहिसर- बोरिवली येथील प्राण्यांवर या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. हॅपी बडस फाउंडेशन या अशासकीय संस्थेने या व्हॅनची उभारणी केली. अशी माहिती मुंबै बँकेचे संचालक, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी भटक्या प्राण्यांवर मोफत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यसंस्कार वाहिनीसाठी 8976741188 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन अभिषेक घोसाळकर यांनी केले आहे.

या मोबाईल वाहिनीच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर, हॅप्पी बड्स फाउंडेशन अध्यक्ष अमरदीप मोठेराव, पोलीस निरीक्षक किरण सुरसे, ईवोन डिसोझा, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार, दर्शीत कोरगावकर तसेच प्राणी प्रेमी उपस्थित होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.