Mumbai Local Updates: कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार?

Coronavirus | येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते. लसीकरण झालेल्या मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यायची का, यावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.

Mumbai Local Updates: कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार?
मुंबई लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 2:55 PM

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते. (Coronavirus situation in Mumbai)

लसीकरण झालेल्या मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यायची का, यावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. मुंबईत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या निम्यापेक्षा जास्त आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत त्यांना भविष्यात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो. दुकाने, शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयात उपस्थिती वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. याचा निर्णय आठ दिवसांत होईल. मात्र, यामध्ये लोकल ट्रेनचा समावेश होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आजूबाजूच्या शहरांमधील स्थितीचा विचार करावा लागेल. याचा निर्णय राज्य स्तरावर होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल हे गृहीत धरून पालिकेनं सर्व तयारी केली आहे. ऑक्सिजन, बेड, औषधे, डॉक्टर यांची जुळवाजुळव सुरू आहे. जुन्या जम्बो कोवीड सेंटरची डागडुजी झालेली आहे. मालाडचे नवे जम्बो कोवीड सेंटर पालिकेच्या ताब्यात आलेले आहे. इतर तीन जम्बो सेंटर महिन्याअखेरीस तयार होतील. दुसऱ्या लाटेपेक्षा तिस-या लाटेची तीव्रता कमी असेल असा अंदाज असला तरी आम्ही मात्र रूग्ण वाढतील हे गृहित धरून सर्व तयारी करत आहोत, असे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस

आतापर्यंत 12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 46,81,780 जणांना कोरोना लसीचा एकच डोस मिळाला आहे. आतापर्यंत एकूण 59 लाख 29 हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

संबंधित बातम्या:

ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, ‘त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक’

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या

(Coronavirus situation in Mumbai)

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.