Crawford Market Fire | क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीवर 20 मिनिटात नियंत्रण
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका दुकानाला आज संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली (Crawford Market Fire).
मुंबई : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका दुकानाला आज (11 जून) संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली (Crawford Market Fire). आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं (Crawford Market Fire).
Mumbai: Fire breaks out at Crawford Market, 6 fire engines present at the spot pic.twitter.com/vPISXvXp2t
— ANI (@ANI) June 11, 2020
क्रॉफर्ड मार्केटमधील एका अत्तराच्या दुकानात ही आग लागली. दुकानातील ज्वलनशील द्राव्यामुळे ही आग भडकली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पोहोचली.
क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानांमध्ये पॅकिंगसाठी पुठ्ठ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्या दुकानात आग लागली त्या दुकानात मोठ्या प्रमाणात पुठ्ठे होते. त्यामुळे आग जास्त भडकली.
क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीला विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झालं. अखेर पोलीस आणि अग्निमशन दलाच्या प्रयत्नांमुळे 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
मोठी दुर्घटना टळली
क्रॉफर्ड मार्केटचा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे. या भागातील वस्ती आणि दुकानं पाहता आग वाढली असती तर मोठं नुकसान झालं असतं. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा : मुंबईत घाटकोपरमध्ये पाच वर्षांचा चिमुरडा नाल्यात पडला, बचावकार्य सुरु